शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाककडून भारताची हेरगिरी

By admin | Updated: July 11, 2015 23:56 IST

वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या भारताविरुद्ध कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानने आता भारताची हेरगिरी करण्यासाठी राजस्थान सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

जोधपूर : वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या भारताविरुद्ध कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानने आता भारताची हेरगिरी करण्यासाठी राजस्थान सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. भारतीय क्षेत्रात हेरगिरीची कुठलीही संधी या देशाचे सैनिक सोडत नाहीत. यासाठी यूएव्ही (मानवरहित विमान) किंवा कॅमेऱ्याचा वापर केला जातो.सीमा सुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक (राजस्थान फ्रंटियर) रवी गांधी यांनी शनिवारी ही धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले की, भारतीय क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी पाकतर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर ही लुडबूड थांबली असली तरी काही भागांत अजूनही चिंताजनक परिस्थिती आहे. पाकिस्तानी रेंजर्स त्यांच्या गुप्तहेरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असावेत. अथवा अमली पदार्थ किंवा शस्त्रास्त्रांची तस्करी करणारे रात्रीच्या अंधारात भारतीय हद्दीत घुसले असतील, असा अंदाज एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. भारत-म्यानमार सीमेवर प्रभावी व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती पुढील काही हप्त्यांत आपला अहवाल सादर करणार असून, समितीच्या शिफारशींनुसार पाऊल उचलण्यात येईल, असे राजनाथसिंह म्हणाले.चिनी तंत्रज्ञानाचा वापर...सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी गेल्या एप्रिल महिन्यात सीमेलगत पाकिस्तानच्या क्षेत्रात १५० ते ४०० मीटर उंचावर एक तीव्र प्रकाशझोत बघितला होता. ते नेमके काय होते आम्हाला माहिती नाही; परंतु ते ड्रोन अथवा यूएव्ही असावे असे मानून आम्ही पाकिस्तानी रेंजर्ससमक्ष हा मुद्दा उपस्थित करून आक्षेप नोंदविला. त्यानंतर काही काळ हा प्रकार थांबला होता; परंतु पुन्हा त्यांनी बाडमेर, जैसलमेर, बिकानेर आणि गंगानगरमध्ये अनेक ठिकाणी सीमेजवळ कॅमेरे बसविणे सुरू केले, असे गांधी यांनी सांगितले. आक्षेपानंतर राजस्थान फ्रंटियरच्या सीमेवरून कॅमेरे हटविण्यात आले असले तरी अन्य फ्रंटियरच्या सीमेवर काही कॅमेरे अजूनही लागलेले आहेत. कॅमेरे बसविण्यासाठी १५ फूट उंच पोल उभारण्यात आले असून यासाठी चिनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. काही कॅमेरे झुडपांमध्ये आहेत.