नवी दिल्ली : दक्षिण चीन सागर वादातील एक पक्षकार असलेल्या चीनने या सागरात व्हिएतनामजवळील भारतीय हायड्रोकार्बन योजनांबाबत तीव्र हरकत घेतल्याचे सांगून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले, की हा भारतीय कंपन्याचा वाणिज्यिक कार्यक्रम असून, आपली हरकत अयोग्य आहे असे भारत सरकारने चीनला कळविलेआहे. लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी गुरूवारी राज्यसभेत चीनच्या या आपत्तीवर प्रश्न विचारला होता. त्याला स्वराज यांनी राज्यसभेत उत्तर दिले. (विशेष प्रतिनिधी)
चीनच्या आक्षेपांना भारताकडून चोख उत्तर
By admin | Updated: December 5, 2014 01:58 IST