शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मसूद अझहरच्या बंदी प्रस्तावाला विरोध करणा-या चीनवर भारताचा संताप

By admin | Updated: February 9, 2017 22:45 IST

चीनचा विरोध पाहता भारतानं तीव्र संताप व्यक्त करत चीनला डेमार्श जारी केलं आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - जैश- ए- मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून जाहीर करण्यासाठी भारताने चालवलेल्या प्रयत्नांमध्ये चीन सातत्यानं विघ्न आणत आहे. त्यावरून भारतानं चीनला तीव्र संताप कळवला आहे. जैश- ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर हा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्यानं भारतानं वारंवार त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र चीनचा विरोध पाहता भारतानं तीव्र संताप व्यक्त करत चीनला डेमार्श जारी केलं आहे. डेमार्श हे राजनैतिक पत्र असून, तीव्र विरोध दर्शवण्यासाठी ते जारी केलं जातं.चीनला डेमार्श जारी केल्याची माहिती भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी दिली आहे. दिल्लीतल्या चीनचे दूतावास आणि बीजिंगच्या परराष्ट्र विभागाला हे डेमार्श देण्यात आलं आहे. मसूद अझहरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव हा फक्त भारतानं दिला नाही, तर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनंही दिला होता, दहशतवाद ही एक जागतिक समस्या आहे, असंही भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप म्हणाले आहेत. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र अझहरवर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रस्तावात चीनने खोडा घातला आहे. त्यामुळे भारतानं तीव्र संताप व्यक्त करत चीनला डेमार्श जारी केलं आहे. अमेरिकेनं फ्रान्स आणि ब्रिटनच्या मदतीने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या समितीसमोर अझहरविरोधातील नवा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र चीनने या प्रस्तावामध्येही अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यानं भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.