शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

मद्यसम्राटाची भारतवापसी?

By admin | Updated: April 19, 2017 03:29 IST

आकाशपाताळ एक करून मद्यसम्राट विजय माल्याला भारतात आणण्यासाठी मोदी सरकार करीत असलेले प्रयत्न यशस्वी होण्याची चिन्हे दिसत असून

हरीश गुप्ता, नवी दिल्लीआकाशपाताळ एक करून मद्यसम्राट विजय माल्याला भारतात आणण्यासाठी मोदी सरकार करीत असलेले प्रयत्न यशस्वी होण्याची चिन्हे दिसत असून, आता न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माल्या भारताच्या हाती येईल. ब्रिटनच्या स्कॉटलँड पोलिसांनी माल्याला अटक करताना, त्याच्या प्रत्यार्पणाची कार्यवाहीही सुरू केली आहे. अटकेनंतर वेस्टमिन्स्टर कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली असली, तरी भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी लगेचच प्रयत्न सुरू केले आहेत.माल्याचे प्रकरण मोदी सरकारची कसोटी पाहाणारे आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांची संसदेच्या स्वागतकक्षात भेट घेतल्यानंतर माल्याने २ मार्च २०१६ च्या रात्री कोणालाही थांगपत्ता न लागू देता भारतातून पळ काढून लंडन गाठले. थकीत कर्जापैकी ४ हजार कोटी रुपये परत करण्याची तयारी दाखवित, त्याने वाद मिटविण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना राजी करावे, यासाठी सरकारला मदत करण्याचे साकडेही घातले. त्यावर जेटली यांनी तुम्हीच स्वत: बँकांशी बोलणी करून वाद तात्काळ मिटवा, असे माल्याला सांगितले होते. तो भारत सोडून गेल्याचे कळताच मोदी सरकारची पंचाईत झाली होती. त्यानंतर सरकारने ब्रिटिश उच्चायुक्तांना पाचारण करून माल्याच्या प्रर्त्यापणासाठी ब्रिटनला मदत करण्याची विनंती केली.फेमा प्रकरण प्रलंबित असताना आयपीएलचा माजी आयुक्त ललित मोदी हाही ब्रिटनला पळून गेला. अशात माल्याने पळ काढल्याने मोदी सरकारच्या प्रतिमेला चांगलाच हादरा बसला. ललित मोदींच्या कॅन्सरग्रस्त पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी ब्रिटनला नेण्यासाठी संबंधित कागदपत्रे मिळवून देण्यासाठी सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे स्पष्ट झाल्याने मोदी सरकार आणखीच कोंडीत सापडले होते. त्यापाठोपाठ मोईन कुरेशीचे प्रकरण उजेडात आले; परंतु माल्यामुळे मोदी सरकार भलतेच अडचणीत सापडले.अखेर जेटली यांनी लंडनला भेट देऊ न आर्थिक घोटाळा करणाऱ्यासाठी लंडन सुरक्षित ठिकाण होऊ शकत नाही, असे स्पष्ट करून ब्रिटिश सरकारला माल्याच्या प्रकरणाचे गांभीर्य पटवून दिले. मोदी यांनीही राजनैतिक मार्गाने माल्या प्रकरण भारताच्या दृष्टीने किती गंभीर आणि महत्त्वाचे असल्याचे कळविले होते. मोईन कुरेशीला भारतात आणून त्याच्याविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात मोदी सरकारला यश आले. तसेच शस्त्रास्त्र विक्रेता संजय भंडारीलाही भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वत:ला ‘द किंग आॅफ गुड टाइम्स’ म्हणणारा विजय माल्याला अखेर दणका बसलाच. त्याची किंगफिशर एअरलाइन्स २०१२ मध्ये वाढत्या कर्जामुळे बंद पडली. कर्जप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून, माल्याला या प्रकरणातही चौकशीला सामोरे जावे लागेल.