शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचा व्हिसा असलेल्या भारतीयांना आता थेट दुबईत प्रवेश

By admin | Updated: May 2, 2017 21:33 IST

अमेरिकेचा व्हिसा किंवा ग्रीन कार्ड असलेल्यांना आता थेट यूएईमध्ये प्रवेश सुरू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 2 -   अमेरिकेचा व्हिसा किंवा ग्रीन कार्ड असलेल्यांना आता थेट यूएईमध्ये प्रवेश सुरू झाला आहे. अमेरिकेचा व्हिसा असलेल्या पहिल्या भारतीय पासपोर्ट धारकाचं दुबईमध्ये स्वागत करण्यात आलं. 1 मे पासून अमेरिकेचा व्हिसा किंवा ग्रीन कार्ड असलेल्यांना आता थेट यूएईमध्ये प्रवेश सुरू झाला असून दुबईमध्ये दाखल झालेल्या पहिल्या प्रवाशाचा फोटो दुबईच्या सरकारने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  
 
यूएईच्या कॅबिनेटनं या विधेयकाला मंजुरी दिली होती. 1 मे पासून त्याची अमलबजावणी सुरू झाली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय राजकीय, आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं यूएईनं हे पाऊल उचललं आहे. त्याप्रमाणेच जागतिक पर्यटनालाही चालना देण्याचा यूएईचा उद्देश आहे.
 
हा व्हिसा 14 दिवसांपुरता मर्यादित असल्याचं सांगितलं जात असून  अतिरिक्त शुल्क देऊन तुम्हाला हा व्हिसा आणखी वाढवता येणार आहे.ज्या भारतीय नागरिकांकडे साधा पासपोर्ट किंवा ग्रीन कार्ड आहे, अशा नागरिकांना यूएईमध्ये प्रवेश केल्यानंतर व्हिसा मिळणार आहे.  या व्हिसाचं नूतनीकरण करायचे असल्यास तुम्हाला अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे, अशी माहिती यूएईनं दिली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास 6 हजार कोटी डॉलरची उलाढाल होते. मेक इन इंडियासाठी भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश हा यूएई आहे. यूएई भारतात 2700 कोटी डॉलरचा माल निर्यात करतो, तर भारत 45,000 कंपन्यांच्या माध्यमातून 3300 कोटी डॉलरचा माल यूएईमध्ये निर्यात करतो. त्याचप्रमाणे यूएई भारतात ऊर्जा, धातू उद्योग, सेवा, तंत्रज्ञान आणि बांधकाम आदी क्षेत्रात एक हजार कोटी डॉलरची गुंतवणूक करत आहे.