शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

लंडन हल्ल्यात भारतीयांना हानी पोहोचलेली नाही - सुषमा स्वराज

By admin | Updated: March 23, 2017 07:39 IST

आपण ब्रिटनमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून लंडनमध्ये राहणा-या भारतीयांना सर्व आवश्यक मदत उपलब्ध करुन देऊ असे स्वराज यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 23 - ब्रिटीश संसदेबाहेर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकही भारतीय मृत अथवा जखमी झालेला नाही अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रात्री उशिरा दिली. या भीषण हल्ल्यात  5 जण ठार झाले असून, 40 जण जखमी झाल्याची माहिती ब्रिटीश पोलिसांनी दिली. आपण ब्रिटनमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून लंडनमध्ये राहणा-या भारतीयांना सर्व आवश्यक मदत उपलब्ध करुन देऊ असे स्वराज यांनी सांगितले. ज्या व्यक्तींना मदत आणि माहिती हवी आहे त्यांच्यासाठी परराष्ट्रमंत्रालयाने 02086295950 आणि 02076323035 हे दोन दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.
 
लंडनमधल्या भारतीय दूतावासाने आपल्या नागरीकांना पार्लमेंट स्कवेअरच्या दिशेने न जाण्याचा तसेच  मेट्रोपोलिटन पोलिसांच्या वेबसाईटवरुन हल्ल्यासंबंधी अधिक माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारताने लंडन दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. लोकशाहीमध्ये दहशतवादाला अजिबात स्थान नसल्याचे परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे. बुधवारी संध्याकाळी संसदेबाहेरच्या परिसरात पादचाऱ्यांना कारने चिरडण्याची, गोळीबार आणि चाकूने भोकसणे अशा तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत.ठार झालेल्यांमध्ये एका हल्लेखोराचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा सामवेश आहे. दरम्यान हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
 
ब्रिटनच्या संसदेबाहेरील वेस्टमिंस्टर ब्रिजवर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला.  काही जणांना कारने चिरडण्यात आले. तसेच चाकूने भोकसण्याची घटनाही घडली.  यात 40 जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, गोळीबार झाल्याचा मोठा आवाज आल्याची माहिती येथील काही नागरिकांनी दिली आहे. दरम्यान, गोळीबार झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संसदेचा परिसर बंद करण्यात आला.. तसेच, या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हाऊस ऑफ कॉमन्सच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी ठार केले असून, संसदेतमध्ये बंदुकधारी पोलीस दाखल झाले आहेत.