नवी दिल्ली : देशात इंटरनेटचे महत्त्व वाढ असल्याचे एका सव्रेक्षणातून अधोरेखित झाले आहे. या सव्रेक्षणानुसार, दररोज 46 टक्के भारतीय सहा तासांहून अधिक काळ इंटरनेट वापरतात. सव्रेक्षणात सहभागी सुमारे 82 टक्के व्यक्तींच्या मते, इंटरनेटपासून दूर राहिल्याने त्यांना काहीसे गमावल्याची भीती वाटते.
टाटा कम्युनिकेशन्सने आपल्या कनेक्टेड वर्ल्ड-2 या अहवालात हा निष्कर्ष मांडला आहे. भारतात सुमारे 46 टक्के लोक दररोज सहा तासांहून अधिक काळ इंटरनेटवर व्यतीत करतात. सव्रेक्षणात फ्रान्स, जर्मनी, भारत, सिंगापूर, अमेरिका व ब्रिटनमधील सुमारे 9,417 इंटरनेट वापरकत्र्याचा समावेश होता. सव्रेक्षणात भारतातील 2,117 इंटरनेट वापरकत्र्यानी भाग घेतला.
अहवालानुसार, सुमारे 56 टक्के भारतीयांना इंटरनेटशिवाय पाच तासांहून अधिक काळ राहिल्यास बेचैन वाटते. भारतीय महिलांच्या तुलनेत इंटरनेट वापरण्यात पुरुष आघाडीवर आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)