शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

भारतीय तरुण कॅनडात होत आहेत स्थायिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 05:28 IST

अमेरिकेत व्हिसाच्या अडचणी : ३९ हजार युवकांनी मिळविले नागरिकत्व

नवी दिल्ली : अमेरिकेचा व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे अनेक भारतीय आता कॅनडामध्ये स्थायिक होऊ लागल्याचे निदर्शनास आले आहे. अमेरिकेच्या शेजारीच असलेल्या कॅनडामध्ये नोकरीसाठी जाणाºया भारतीयांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

२०१८ मध्ये तब्बल ३९ हजार ५०० भारतीयांनी कॅनडाचे नागरिकत्व मिळवले. जगभरातील तरुणही आता कॅनडामध्येच स्थायिक होत असून, गेल्या वर्षी ९२ हजार लोकांनी त्या देशाचे नागरिकत्व मिळवले आहे. हे प्रमाण आधीच्या वर्षीच्या म्हणजे २०१७ च्या तुलनेत ४१ टक्क्यांनी अधिक आहे. कॅनडाने उच्चशिक्षित तरुणांनी तिथे यावे, यासाठी पायघड्याच घातल्या आहेत. त्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे.जगातील ६५ हजार ५०० जणांनी २०१७ साली कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले होते. त्यात भारतीयांचे प्रमाणही मोठे होते; पण २०१८ साली ते प्रमाण ५१ टक्क्यांनी वाढले. चीन व नायजेरियातूनही असंख्य तरुण कॅनडामध्ये रोजगारासाठी जात आहेत.

अमेरिकेत गेल्या दोन वर्षांत एच१-बी व्हिसा मिळवण्यात असंख्य अडचणी येत आहेत. व्हिसा मिळणे खूपच दुरापास्त झाले असून, तो मिळण्यास विलंब होतो. तोपर्यंत डोक्यावर टांगती तलवार असते. तो न मिळाल्यास आयत्या वेळी देश सोडण्याची वेळ येते. तसेच ग्रीन कार्डचा बॅकलॉगही मोठा आहे. दाम्पत्यापैकी एकाला ग्रीन कार्ड असेल तरी त्यांच्यातील दुसºयाला ते मिळण्याची खात्री नसते. त्यामुळे तणावाखाली राहण्यापेक्षा कॅनडामध्ये जाणे सोयीस्कर वाटते, असे अनेक भारतीयांचे म्हणणे आहे.ट्रेंड वाढत जाणारअनेक भारतीय विद्यार्थी अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी जातात. त्यांच्यापैकी बहुतांशी जणांना नंतर तिथेच नोकºया मिळतात वा मिळू शकतात; पण त्या मिळूनही व्हिसाची खात्री नसते.त्यामुळे शेजारीच असलेला कॅनडा देश अनेकांना सोयीचा वाटतो. त्यामुळे कॅनडात जाण्याचा ट्रेंड वाढत जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

टॅग्स :Americaअमेरिका