शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

भारतीय रेल्वेने लाँच केली सौर ऊर्जेवर चालणारी ट्रेन

By admin | Updated: July 14, 2017 16:27 IST

भारतीय रेल्वेने प्रथमच सौरऊर्जेवर चालणा-या डिझेल ट्रेनचा वापर सुरु केला आहे. शुक्रवारी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकात या ट्रेनचे उदघाटन झाले.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 14 - भारतीय रेल्वेने प्रथमच सौरऊर्जेवर चालणा-या डिझेल ट्रेनचा वापर सुरु केला आहे. शुक्रवारी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकात या ट्रेनचे उदघाटन झाले. दिल्लीच्या सराई रोहिला ते हरयाणाच्या फारुख नगर या मार्गावर ही ट्रेन धावेल. ट्रेनच्या एकूण सहा डब्ब्यांवर सौर ऊर्जेचे 16 पॅनल बसवण्यात आले आहेत.  मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत या सोलार पॅनलची निर्मिती करण्यात आली असून, त्यासाठी 54 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. 
 
जगात प्रथमच रेल्वेमध्ये सोलार पॅनलचा विद्युत ग्रीड म्हणून वापर करण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये पावर बॅकअपची सुविधा असून, ही ट्रेन 72 तास बॅटरीवर चालू शकते. मागच्यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढच्या पाचवर्षात रेल्वे 1 हजार मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करेल अशी घोषणा केली होती. सोलार पॅनलवर चालणा-या डिझेल इलेक्ट्रीकल युनिटच्या ट्रेन या योजनेचा एक भाग आहे. स्वच्छ आणि अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी रेल्वे कटिबद्ध असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उदघाटनाच्यावेळी सांगितले. 
 
आणखी वाचा 
खूशखबर ! रेल्वेमध्ये बंपर भरती, एक लाख तरुणांना मिळणार नोक-या
जीआरपीला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा
इन्फोसिस करणार 20 हजार कर्मचा-यांची भरती
 
शहरी भागात प्रथम सौर ऊर्जेवर ट्रेन चालवल्या जातील.  त्यानंतर लांब पल्ल्याच्या ट्रेन्समध्ये सोलार पॅनल्स बसवण्यात येतील असे रवींद्र गुप्ता यांनी सांगितले. ते रेल्वे बोर्डाचे सदस्य आहेत. पुढच्या काही दिवसात आणखी 50 डब्ब्यांवर सोलार पॅनल्स बसवण्याची योजना आहे. संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भारतीय रेल्वेचे 700 कोटी रुपये वाचतील असे रवींद्र गुप्ता यांनी सांगितले. सौर ऊर्जेमुळे  पुढच्या 25 वर्षात रेल्वेला 5.25 लाख लिटर डिझेल वाचवता येईल. याच काळात प्रत्येक ट्रेनवर 3 कोटी रुपये वाचतील. सौर ऊर्जेमुळे 25 वर्षात 1350 टनांनी कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल. 
 
रेल्वे अॅपवरून करता येणार विमानाचं तिकीट बुकिंग
ज्या प्रवाशांना विमानाचं तिकीट बुकिंग करायचं आहे अशा प्रवाशांसाठी एक सोपा पर्याय रेल्वेकडून मिळणार आहे. प्रवाशांना आता मोबाइलवरील रेल्वे अॅपवरुन विमानाचं तिकिट बूक करता येणार आहे.  रेल्वेकडून या आठवड्यात नवं मोबाइल अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. या नव्या अॅपमुळे प्रवाशांना अनेक सोयी सुविधांचा लाभ घेता येइल.