शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेटच्या वादावरून अमेरिकेत भारतीयाची हत्या

By admin | Updated: May 7, 2017 10:48 IST

अमेरिकेच्या मोडेस्टो शहरात एका 32 वर्षीय भारतीय नागरिकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे .

ऑनलाइन लोकमत

कॅलिफोर्निया, दि. 7 - अमेरिकेच्या मोडेस्टो शहरात एका 32 वर्षीय भारतीय नागरिकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे .  जगजीत सिंग यांची हत्या सिगारेटवरून झालेल्या वादातून झाल्याचं समोर येत आहे. पंजाबच्या कपूरथला येथील रहिवासी जगजीत गुरुवारी रात्री  आपले दुकान बंद करत असताना त्यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला.  जवळपास वर्षभरापूर्वी जगजीत अमेरिकेला गेले होते. 

जगजीत हे जवळपास 9 तास मृत्युशी झुंज देत होते पण उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला. सिंग यांचे मेव्हणे के. एस. चीमा यांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुरुवारी रात्री सिंग यांच्या दुकानात एक ग्राहक सिगारेट घेण्यासाठी आला.  सिंग यांनी नियमानुसार  त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली, पण त्याने दाखवलेले ओळखपत्र अयोग्य असल्याने दोघांमध्ये वादावादी झाली आणि तो ग्राहक निघून गेला. त्यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास जगजीत सिंग दुकान बंद करत असताना एका अज्ञाताने त्यांच्यावर चाकूने वार केले. 9 तास मृत्युशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला. 
 
यापुर्वी सिलिकॉन व्हॅलीत भारतीय वंशाच्या आयटी तंत्रज्ञाची आणि त्याच्या पत्नीची हत्या  गोळ्या घालून हत्या कऱण्यात आली.  नरेन प्रभू असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांची आणि त्यांच्या पत्नीची राहत्या घरातच हत्या करण्यात आली. मिर्जा ततलिक असं हल्लेखोराचं नाव असून हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी नरेन यांच्या मुलीचे आणि हल्लेखोर आरोपीचे प्रेम प्रकरण होते. मात्र, त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. त्यातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.  नरेन यांच्या 20 वर्षीय मुलाने पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली .