ऑनलाइन लोकमत
सहारणपूर, दि. ६ - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयित दहशतवाद्याला सहारणपूर येथून अटक केली आहे. एजाज शेख असे त्याचे नाव असून काल रात्री त्याला अटक करण्यात आल्याचे समजते. शेख हा फेब्रुवारी २०१४ पासून गायब होता. त्याला दिल्लीत आणण्यात येत असून तेथे त्याची पुढील चौकशी करण्यात येईल.