शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

भारतीय हॅकर्सचं पाकिस्तानला प्रत्युत्तर, 500 वेबसाइट केल्या हॅक

By admin | Updated: April 26, 2017 06:09 IST

भारतीय हॅकरच्या एका गटाने पाकिस्तानातील 500 हून जास्त संकेतस्थळं केली हॅक,मुख्य राजकीय पक्षांपैकी एक "पाकिस्तान पीपल्स पार्टी"च्या वेबसाइटचाही समावेश

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 -  भारतातील दहा प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइटस् हॅक करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला.  ‘पाकिस्तान हॅकर्स’ नावाच्या एका गटाने दिल्ली विद्यापीठ, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बीएचयू या प्रमुख शैक्षणिक संस्थांसह  10 संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळांवर "पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा टाकून ही संकेतस्थळे हॅक केली. त्यानंतर आता भारतीय हॅकरच्या एका गटाने पाकिस्तानातील 500 हून जास्त संकेतस्थळं हॅक केल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानमधील मुख्य राजकीय पक्षांपैकी एक "पाकिस्तान पीपल्स पार्टी"चं संकेतस्थळही हॅक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. "आज तक"ने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
या वृत्तानुसार, भारतीय हॅकरच्या एका गटाने "रॅंन्समवेअर"द्वारे पाकिस्तानातील 500 हून जास्त वेबसाइट हॅक केल्या आहेत. यामध्ये मुख्य राजकीय पक्षांपैकी एक "पाकिस्तान पीपल्स पार्टी"च्या वेबसाइटचाही समावेश आहे. हॅक करण्यात आलेल्यांपैकी जास्त वेबसाइट या पाकिस्तान सरकारशी संलग्न आहेत. विशेष म्हणजे वेबसाइट हॅक करण्यासाठी "रॅंन्समवेअर"चा वापर करण्यात आला आहे. "रॅंन्समवेअर"द्वारे हॅक केलेल्या वेबसाइटला हॅकरच्या तावडीतून सोडवणं कठीण असतं आणि शक्यतो त्यासाठी पैशांची तोडजोड केली जाते. वेबसाइटवर हॅकर्सनी फेसबुक पेजची माहिती दिलेली असते तेथे पैशांबाबतची बोलणी केली जाते.   
 
"टीम इंडियन ब्लॅक हॅट" असं हॅक करणा-या गटाचं नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हॅक करण्यात आलेल्या वेबसाइटवर "केरला सायबर वॉरिअर्स" असं लिहिण्यात आलं आहे. पण इतक्या वेबसाइट एका गटाने हॅक केल्या नसून यामध्ये Luzsecind, team black hats आणि United Indian hackers अशा अनेक गटांचा समावेश  असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दिवसांमध्ये आणखी वेबसाइट हॅक करणार असल्याचा दावाही हॅकर्सनी केला आहे. 
 
यापुर्वी भारतातील दहा प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइटस् हॅक करून त्यावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ ही घोषणा टाकल्याने खळबळ उडाली. दिल्ली विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी-दिल्ली आणि आयआयटी-बीएचयू या संस्थांसह दहा वेबसाइट्सवर हल्ला चढविणाऱ्याने आपण पाकिस्तान हॅक्झॉर क्रू असल्याचे म्हटले.
 
काश्मीरचा राग आवळला-
या वेबसाइट्सवर टाकण्यात आलेल्या दोन व्हिडीओंसोबत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी ओळ आहे. यात काश्मिरात निर्दयीपणे अत्याचार करणाऱ्या भारतीय लष्कराविरुद्ध काश्मिरी लोक निदर्शने करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाची दखल घेतली असून, वेबसाइट लवकरच ठीक केली जाईल.
 
विद्यापीठे झाली सतर्क-
अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा प्रकार आमच्याही निदर्शनास आला असून, विद्यापीठाचा आयटी विभाग हा प्रकार रोखण्यासाठी आवश्यक ते उपाय करीत आहे. तथापि, आयआयटी-दिल्ली आणि आयआयटी-बीएचयूची यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
 
भारतीयांना इशारा-
वेबसाइट्सवर टाकण्यात आलेल्या संंदेशात हॅकर्सनी असे म्हटले आहे की, भारत सरकार आणि भारतीय जनतेला अभिवादन! तुमचे तथाकथित जवान काश्मिरात काय करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? काश्मिरात अनेक निरपराध लोक मारले जात आहेत, हे ठाऊक आहे का? त्यांनी अनेक मुलींवर बलात्कार केला आहे. ते आजही काश्मीरमधील मुलींवर कुकर्म करीत आहेत? हे माहीत आहे का? तुमचे भाऊ, बहीण, आई-वडिलांना ठार मारले, तर काय वाटेल? तुमच्या आई-बहिणीवर बलात्कार केल्यास काय वाटेल? तुमचे कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही का?