शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: भारतीय तटरक्षक दलाकडून अरबी समुद्रात अडकलेल्या 264 मच्छिमारांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 07:40 IST

व्यापारी जहाजांच्या मदतीनं तटरक्षक दलाचं रेस्क्यू ऑपरेशन

मुंबई: भारतीय तटरक्षक दलानं व्यापारी जहाजांच्या मदतीनं अरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छिमारांची सुटका केली आहे. अचानक हवामान बिघडल्यानं मच्छिमारांच्या ५० बोटी समुद्रात अडकल्या होत्या. याबद्दलची माहिती तामिळनाडूमधील मच्छिमार संघटनांकडून भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. पश्चिम गोव्यापासून २५० नॉटिकल मैल अंतरावर मच्छिमार बोटी अडकल्या होत्या. तटरक्षक दलानं तातडीनं मदतकार्य सुरू करत सर्व मच्छिमारांची सुखरुप सुटका केली. खराब हवामानामुळे ५० मच्छिमार बोटी समुद्रात अडकल्याची माहिती ३ डिसेंबरला भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. भरसमुद्रात अडकलेल्या मच्छिमारांना तातडीनं मदत देणं गरजेचं असल्यानं तटरक्षक दलानं या भागात असणाऱ्या सात व्यापारी जहाजांशी संपर्क साधत त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. या जहाजांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे अडकलेल्या मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला. यानंतर लगेचच तटरक्षक दलाच्या बोटी मच्छिमारांच्या सुटकेसाठी रवाना झाल्या. भारतीय व्यापारी जहाज नवधेनू पूर्णानं ८६ मच्छिमारांची सुटका केली. तर जपानच्या एम व्ही तोवाडा जहाजानं ३४ मच्छिमारांची सुटका केली. भारतीय तटरक्षक दलाच्या विनंतीवरुन मॅरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटरनं या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. मॅरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटरच्या सूचनेवरुन आणखी पाच व्यापारी जहाजं या अभियानात सहभागी झाली. त्यामुळे २६४ मच्छिमारांची सुटका झाली.मच्छिमारांची सुटका केल्यानंतर त्यांना खाद्यपदार्थ आणि प्रथमोपचार देण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या सर्व मच्छिमारांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलानं दिली आहे. तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहरी, समर, सावित्रीबाई फुले, अमल आणि अपूर्वा या जहाजांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. याशिवाय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टरदेखील या मोहिमेत सहभागी झालं होतं.  

 

टॅग्स :fishermanमच्छीमार