शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाक-अफगाणच्या ४,३०० निर्वासितांना भारतीय नागरिकत्व

By admin | Updated: June 15, 2015 00:06 IST

शेजारी देशांमधून आलेल्या सुमारे दोन लाख निर्वासितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्याच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तान व

नवी दिल्ली : शेजारी देशांमधून आलेल्या सुमारे दोन लाख निर्वासितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्याच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तान व अफगाणिस्तानमधून आलेल्या हिंदु व शिख निर्वासितांना गेल्या वर्षभरात भारताचे नागरिकत्व बहाल केले आहे. याआधीच्या संपुआ-२ सरकारच्या संपूर्ण पाच वर्षांच्या कालखंडात अशा १,०२३ निर्वासितांना नागरिकत्व दिले गेले होते.वास्तव्याच्या देशात छळ सोसणाऱ्या हिंदुंना भारताचे दरवाजे खुले आहेत, असे धोरण भाजपने जाहीर केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या पुढाकाराने या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले गेले आहे. पाकिस्तान व बांगलादेशातून आलेल्या हिंदु निर्वासितांना इतर भारतीय नागरिकांप्रमाणे वागणूक देण्याचे पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारातही जाहीर केले होते. सध्या पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून आलेले सुमारे दोन लाख हिंदु निर्वासित भारतात राहात आहेत.मोदी सरकार गेल्या २६ मे रोजी सत्तेवर आल्यापासून सुमारे १९ हजार निर्वासितांना मध्य प्रदेशत, ११ हजार निर्वासितांना राजस्थानात तर चार हजार निर्वासितांना गुजरातमध्ये दीर्घकालिन वास्तव्यासाठी व्हिसा देण्यात आले आहेत, असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.निर्वासितांच्या दीर्घकालिन वास्तव्यासाठीच्या व्हिसाचे अर्ज स्वीकारणे व त्यावर प्रक्रिया करण्याचे सर्व काम आॅनलाइन करण्याची व्यवस्ता केंद्रीय गृह मंत्रालयाने एप्रिलपासून सुरु केली आहे.कायम स्थायिक होण्याच्या उद्देशाने पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्या निर्वासितांच्या अडचणी दूर करण्यासाठी असे करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)