शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भारतात लवकरच परदेशी विद्यापीठांचे कँम्पस

By admin | Updated: April 19, 2016 03:22 IST

उच्च शिक्षणात परदेशी विद्यापीठांचे भारतात आगमन हे स्वप्न नव्हे, तर वास्तव बनण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीउच्च शिक्षणात परदेशी विद्यापीठांचे भारतात आगमन हे स्वप्न नव्हे, तर वास्तव बनण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीती आयोग व मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केलेल्या सूचनेनुसार आयोगाने आपला अहवाल पंतप्र्रधान कार्यालय व मनुष्यबळ विकास मंत्रालयाला १६ एप्रिल रोजी सादर केला आहे. अहवालाच्या शिफारशींनुसार मनुष्यबळ मंत्रालयात हालचालींना प्रारंभही झाला आहे.परदेशी विद्यापीठांना भारतात आपले कॅम्पस सुरू करण्यास अनुमती देणारा प्रस्ताव, नवा नाही. या प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी नरसिंह राव सरकारच्या कारकिर्दीत १९९५ साली पहिल्यांदा विधेयकही तयार झाले. मात्र त्याचा प्रवास संसदेपर्यंतही होऊ शकला नाही. विधेयकाच्या मंजुरीचा प्रस्ताव दुसऱ्यांदा यूपीएच्या पहिल्या कारकिर्दीत २00५/0६ साली झाला. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीतच त्याला विरोध झाल्याने हे प्रकरणही बारगळले. तिसरा आणि शेवटचा प्रयत्न यूपीए सरकारने २0१0 साली परदेशी शैक्षणिक संस्था विधेयक संसदेत मांडून केला. तथापि भाजप व इतर पक्षांच्या विरोधामुळे विधेयक मंजूर झाले नाही. अखेर २0१४ साली विधेयक लॅप्स झाले. परदेशी विद्यापीठांबाबत भाजपने पूर्वीची भूमिका बदलली असून पंतप्रधानांच्या विविध परदेश वाऱ्यानंतर या विषयाला पुन्हा गती मिळाली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे नीती आयोगाने जो प्रस्ताव पाठवला, त्यात मुख्यत: परदेशी विद्यापीठांना भारतात आपले कॅम्पस सुरू करण्यास अनुमती देण्याची शिफारस आहे.