शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाकमधून आलेल्या हिंदूंसाठी भारतीय बँकांची कवाडे खुली

By admin | Updated: July 15, 2015 16:49 IST

पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू निर्वासितांसाठी आता देशात बँक खातं उघडण्याची व जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळू शकते.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - पाकिस्तान व अफगाणिस्तानमधून आलेल्या हिंदू निर्वासितांना मोदी सरकारकडून मोठा दिलासा मिळणार असून या हिंदूंना भारतीय नागरिकत्वाशिवाय देशात बँक खातं उघडण्याची व जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 
'इतर देशांमध्ये छळ सहन कराव्या लागणा-या हिंदूंचे रक्षण करणे आमची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांना आपण वा-यावर सोडणार नाही' असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. सत्तेवर आल्यावर मोदींनी वचनपूर्तीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पाकिस्तान व अफगाणिस्तातून आलेल्या हिंदूना मोदी सरकारतर्फे भारतीय नागरिकत्व देण्यात येत असून गेल्या वर्षभरात ४ हजारांहून अधिक हिंदूना नागरिकत्व मिळाले आहे, युपीए-२ सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात हे प्रमाण एक हजार इतकेच होते. याशिवाय पाकमधील निर्वासित हिंदूना व्हिसा व फॉरेनर रजिस्ट्रेशन ऑफिसने (एफआरओ) जारी केलेल्या परवान्याच्या आधारावर बँक खाते उघडता येईल. 
पाकिस्तानमध्ये हिंदू  नागरिकांना सहन करावा लागलेला छळ, त्यांच्या झालेल्या हाल-अपेष्टांमुळे त्यांना भारतात या सुविधा देण्यास भारत सरकार पुढाकार घेत आहे. तसेच पाकिस्तानामधील या निर्वासितांना आरबीआयच्या मंजुरीशिवाय सामान्य नागरिकांप्रमाणेच बँक खाते उघडता येऊ शकेल. सध्याच्या नियमांनुसार, भारताबाहेरील कोणत्याही देशात राहणारी व्यक्ती 'एनआरओ' अकाऊंट उघडू शकते, मात्र पाकिस्तान व बांग्लादेशमधील नागरिकांना हे खातं उघडायचे असेल तर रिझर्व्ह बॅकेंची मंजुरी आवश्यक असते. पण मोदी सरकार मात्र पाकिस्तानमधील हिंदू निर्वासितांना या छाननीतून सूट देण्याच्या विचारात असून ते या नियमाला अपवाद ठरण्याची शक्यता आहे.