शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादग्रस्तांसाठी भारतीय लष्कराच्या शाळा

By admin | Updated: April 6, 2016 22:15 IST

सीमेपलिकडील अतिरेक्यांना स्थानिकांची सहानुभूती मिळू नये, ते सदैव भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडलेले राहावेत, यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराला विशेष प्रयत्न करावे लागतात

संकेत सातोपे,  जम्मूसीमेपलिकडील अतिरेक्यांना स्थानिकांची सहानुभूती मिळू नये, ते सदैव भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडलेले राहावेत, यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराला विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे येथील अनेक नागरी समस्या सोडविण्यात लष्कर अग्रभागी आहे. येथील दहशतवादग्रस्तांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जम्मूमधील भारतीय लष्कराच्या १६ कॉर्पच्या माध्यमातून तब्बल आठ शाळा चालविण्यात येत आहेत. सेवाभावी प्रकल्पांवर १६ कॉर्प वर्षाकाठी तब्बल ९ कोटी रु पये खर्च करत असल्याची माहिती जम्मूच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांना १६ कॉर्पचे प्रमुख कमांडिंग अधिकारी लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांनी दिली.पुँछ जिल्ह्यातील सुरणकोट! काही वर्षांपूर्वी हा भाग अतिरेक्याचा तळ होता. अतिरेक्यांनी येथील अनेक लोकांच्या हत्या केल्या, अनेकांच्या मालमत्तांची धुळधाण केली. लष्करी कारवायांनंतर येथील भागात आता शांतता नांदत आहे. परंतु आता येथे मोठे आव्हान आहे ते अतिरेकी कारवायांना बळी पडलेल्यांच्या पूनर्वसनाचे. त्यासाठीच लष्कराने अतिरेकी कारवायांतील पीडितांच्या मुलांसाठी पोथा येथे २००१ साली आर्मी गुडविल स्कूलची स्थापना केली आहे. ना नफा ना तोटा तत्त्वावर ही शाळा चालविण्यात येते. ५०० ते ६०० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. हमीरपूर येथील पाइनवूड स्कूल हीसुद्धा अशाच प्रकारची लष्कराकडून चालविण्यात येणारी शाळा आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळाबारीला बळी पडलेल्यांच्या मुलांसाठी अगदी एलओसीच्या जवळच १९९६ साली ही शाळा स्थापन करण्यात आली आहे. येथील काही शिक्षकांनी याच शाळेत शिक्षण घेऊन आता येथेच नोकरी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध झाला आहे आणि विद्यार्थ्यांची सोयसुद्धा झाली आहे.> इंग्रजी माध्यमातून अत्यंत कमी पैशात शिक्षण मिळत असल्यामुळे आता पालकांचाही या शाळेकडे ओढा आहे. परंतु, सुरूवातीच्या काळात मात्र विद्यार्थीच काय शिक्षकही शाळेत येण्यास घाबरत होते. लष्कराच्या शाळेत शिकवल्यामुळे आपण अतिरेक्यांचा रोष ओढावून घेऊ अशी त्यांची भीती होती, परंतु अखेर लष्कराने त्यांचा विश्वास संपादन केला. सीमा बाली या इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेने म्हटले की, येथे मुख्यत: पहाडी भाषिक विद्यार्थी असल्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेत अवगत करणे थोडे अवघड काम आहे, मात्र आम्ही त्यांच्या इंग्रजी शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करतो.