शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: काश्मीरमध्ये दहशतवाद्याचे लाईव्ह एन्काऊंटर; जीव वाचवण्याठी पळाला तितक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 10:02 IST

भारतीय लष्कराने सात मिनिटांत दहशतवाद्याचा खात्मा केल्याचा बारामुल्ला चकमकीचा व्हिडिओ समोर आला आहे.

Baramulla Encounter : जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ले सुरु केले आहेत. बारामुल्लामध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. शनिवारी किश्तवाडमध्येही दोन जवान शहीद झाले तर अन्य दोघे जखमी झाले. त्यानंतर आता बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. दहशतवाद्यांच्या खात्म्याच्या हा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दहशतवादी मृत्यूच्या भीतीने पळताना दिसत आहेत.

शनिवारी बारामुल्लाच्या पट्टणमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. त्यावेळी तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं. या हल्ल्याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक दहशतवादी जीव वाचवण्यासाठी इमारतीतून पळताना दिसतोय. पळण्याचा रस्ता शोधत असताना लष्कराचे जवान गोळीबार करतात आणि त्याला ठार करतात. लष्कराने या कारवाईला अत्यंत महत्त्वाचे म्हटलं आहे. बारामुल्लाच्या चक थापर क्रिरीमध्ये ही कारवाई करण्यात आली. मारले गेलेले तिघेही कट्टर दहशतवादी असल्याची माहिती समोर आली. याशिवाय येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. लष्कराच्या १० सेक्टर राष्ट्रीय रायफल्सचे ब्रिगेडियर संजय कानोथ यांनी ही माहिती दिली. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सला या इमारतीमध्ये ३ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच काश्मीर पोलिसांनी एसओजी टीमसह घेराव घातला आणि त्यानंतर एकामागून एक दहशतवादी मारले गेले. भारतीय लष्कराने सात मिनिटांत तिन्ही दहशतवाद्यांचा  खात्मा केला. राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर ब्रिगेडियर संजय कन्नोथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर काश्मीर जिल्ह्यातील पट्टण भागातील चक टप्पर क्रिरी येथे शोध मोहीम सुरू केली होती. 

चकमकीच्या ड्रोन फुटेजमध्ये दहशतवादी ज्या घरात लपला होता त्या घरातून पळताना दिसत आहे. तो बाउंड्री वॉलच्या दिशेने झाडांकडे धावतो. त्याच क्षणी त्याला गोळी लागते आणि तो खाली पडतो. यानंतर तो भिंतीकडे रेंगाळत जाण्याचा प्रयत्न करतो. हा दहशतवादी पुढे जाताच लष्कराच्या जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला. लष्कराने दहशतवाद्याला ठार करण्यासाठी भिंतीवरही गोळ्या झाडल्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात धुर झाला.

"रिकाम्या इमारतीत लपलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या जवानांवर गोळीबार केला. आम्ही आमच्या कार्यपद्धतीनुसार त्यांना प्रत्युत्तर दिले. त्या जागेला वेढा घातला गेला आणि अधिक बल पाठवण्यात आले. दहशतवाद्यांनी रात्रभर जवानांवर जोरदार गोळीबार सुरू ठेवला, ज्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले," असे ब्रिगेडियर संजय कानोथ यांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी