शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

भारत नेपाळी जनतेचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करेल - मोदी

By admin | Updated: April 26, 2015 13:09 IST

भूकंपासारख्या आपत्तीचे भयावह चित्र मी जवळून बघितले असून अशा संकटाच्या समयी भारत नेपाळी जनतेचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २६ - भूकंपासारख्या आपत्तीचे भयावह चित्र मी जवळून बघितले असून अशा संकटाच्या समयी भारत नेपाळी जनतेचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ येणा-या नैसर्गिक आपत्तींमुळे दुःखी झालो आहे असेही त्यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाव्दारे संवाद साधला. यात त्यांनी नेपाळ व उत्तर भारतात आलेल्या भूकंपाविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'संकटाच्या समयी भारत तुमच्यासोबत असून नेपाळी जनतेचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु असे सांगत मोदी म्हणाले, गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने भारतात शेतीचे अतोनात नुकसान झाले, आता नेपाळ व उत्तर भारतात भूकंपाचा धक्का बसला आहे, लागोपाठ येणा-या या नैसर्गिक संकटांमुळे दुःखी झालो असून आज मन की कार्यक्रम करायची इच्छाही नव्हती असे त्यांनी नमूद केले.  २६ जानेवारी २००१ मध्ये गुजरातमध्ये आलेला भूकंप मी जवळून बघितला असल्याने नेपाळी जनतेचे दुःख मी समजू शकतो असे मोदींनी नमूद केले. 

नेपाळमध्ये सध्या बचावकार्यावर भर देणे गरजेचे असून अनेक जण ढिगा-याखाली अडकले आहेत. या सर्वांची जीवंत सुटका व्हायला हवी. यानंतरच तिथे दिर्घकाळ पुनर्वसनाची मोहीम राबवावी लागेल असे मोदींनी स्पष्ट केले. तसेच वर्ल्डकप सेमीफायनलमध्येे भारतीय संघाचा पराभव झाल्यावर ज्यापद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त झाल्या ते अयोग्य होते असेही मोदींनी आवर्जून सांगितले.