शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो तरी भारत हा अतुल्यच राहणार - आमिर खान

By admin | Updated: January 7, 2016 18:22 IST

अभिनेता आमिर खानला अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन काढून टाकण्यात आल्याचे वृत्त काल झळाकले. त्यावर पर्यटन विभागाने आमिर खानसोबत अतुल्य भारत

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ७ - अभिनेता आमिर खानला अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन काढून टाकण्यात आल्याचे वृत्त काल झऴकले. त्यावर पर्यटन विभागाने आमिर खानसोबत अतुल्य भारत मोहिमेसाठी झालेला करार संपला असून त्याला काढले नसल्याचा दावा करत मिडीयामध्ये आलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. 
मात्र, यावर आमिर खाने मिडीयाशी बोलताना सांगितले की, गेली दहा वर्षे मी अतुल्य भारत मोहिमेचा ब्रॅण्ड अॅम्बेसडर होतो. हा माझ्यासाठी मोठा सन्मान समजतो. देशाची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे. यापुढेही देशाची सेवा करण्यास तयार आहे. आत्तापर्यंत मी पब्लिक सर्व्हिस फिल्मसाठी मोफत काम करत आलो आहे. अशाप्रकारे मला देशाची सेवा करण्यासाठी संधी मिऴाली, त्यामुळे मला हा मिऴालेला सन्मान समजतो. अतुल्य भारत मोहिमेसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसडर असावा की नाही, असल्यास कोण असावा हे ठरविण्याचा अधिकार सरकारचा आहे. त्यामुळे अतुल्य भारत मोहिमेसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन मला काढण्याचा सरकारच्या निर्णयाचा मी आदर करतो. सरकारकडून देशासाठी जे सर्वोत्तम असेल, त्याचदृष्टीने पुढची पावलं उचलली जातील अशी मला खात्री आहे. तसेच, मी ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो तरी आपला देश हा अतुल्यच राहणार असल्याचे आमिर खानने सांगितले.