नवी दिल्ली : काही मोजकेच असहिष्णू लोक असलेला भारत हा सहिष्णू देश आहे. केवळ हिंदू मूलतत्त्ववाद्यांवरच नव्हे, तर मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांवरही लक्ष केंद्रित करण्याची वेळ आलेली आहे, असे बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी म्हटले आहे.प्रत्येक समाजात काही लोक असहिष्णू असतातच,’ असे नसरीन यांनी स्पष्ट केले. मालदा येथील हिंसाचाराच्या घटनेचा संदर्भ देत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, हिंदू मूलतत्त्ववादाद्यांबद्दल खूप काही बोलले जाते; पण आता मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांबद्दलही कुणीतरी बोलले पाहिजे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारत हा सहिष्णू देश -तस्लिमा
By admin | Updated: January 11, 2016 02:45 IST