शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

डोपिंगमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर

By admin | Updated: April 29, 2016 02:46 IST

स्पर्धात्मक खेळात भारत अद्याप माघारलेला आहेच; पण डोपिंगमध्ये मात्र जागतिक स्तरावर भारताने तिसरे स्थान पटकाविले.

नवी दिल्ली : स्पर्धात्मक खेळात भारत अद्याप माघारलेला आहेच; पण डोपिंगमध्ये मात्र जागतिक स्तरावर भारताने तिसरे स्थान पटकाविले. आंतरराष्ट्रीय डोपिंग संस्थेच्या (वाडा) अहवालानुसार २०१४ साली जी प्रकरणे उघड झाली, त्यात भारत ९६ प्रकरणांसह तिसऱ्या स्थानी आला. विविध देशांच्या राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीने वाडाला दिलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार झाला आहे.रशिया १४८ प्रकरणांसह अव्वल स्थानावर असून, इटली १२३ प्रकरणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतानंतर बेल्जियम ९१, फ्रान्स ९१, तुर्कस्तान ७३, आॅस्ट्रेलिया ४९, चीन ४९, ब्राझील ४६, आणि द. कोरिया ४३ यांचा अव्वल दहा देशांत समावेश आहे. या सर्व प्रकरणात खेळाडूंविरुद्ध निर्णय देण्यात आला. खेळाडूंना एकतर तंबी देण्यात आली किंवा काही काळासाठी निलंबित करण्यात आले, अशी ही प्रकरणे आहेत. भारतात जी ९६ प्रकरणे सूचीबद्ध झाली त्यातील चार प्रकरणे विश्लेषणात्मक होती. अ‍ॅथलेटिक्स आणि कुस्तीमधील प्रत्येकी २ खेळाडू चौकशीसाठी उपस्थित होऊ शकले नाहीत. ९६ पैकी ५६ पुरुष आणि २३ महिला खेळाडू स्पर्धेदरम्यान झालेल्या परीक्षणात अपयशी ठरले. नऊ पुरुष आणि ४ महिला स्पर्धेनंतर झालेल्या परीक्षणात दोषी आढळल्या. १९२०पासून आजपर्यंत भारताच्या आॅलिम्पिक पदकांची संख्या केवळ २४ झाली; पण काही वर्षांत डोपिंगमध्ये सर्वाधिक खेळाडू अडकणाऱ्या देशांपैकी भारत प्रमुख देश ठरला आहे. सर्वाधिक डोपिंग प्रकरणे अ‍ॅथलेटिक्समधील आहेत. अ‍ॅथलेटिक्समध्ये २९, पॉवर लिफ्टिंगमध्ये २३, वेटलिफ्टिंग २२, बास्केटबॉल ३, ज्युडो ३, तायक्वांदो तीन, कुस्ती तीन, वुशू तीन, बॉक्सिंग दोन, कनोयिंग व कयाकिंग एक, नेमबाजी एक, सॉफ्ट टेनिस एक, पॅराअ‍ॅथलेटिक्स व पॅराज्योडो यातही प्रत्येकी एक खेळाडू दोषी आढळला.अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताचे २९, तर रशियाचे ३९ खेळाडू आहेत. इटली १५, फ्रान्स १४, चीन १३ आणि केनिया १२ असा क्रम आहे. यावर भारतीय अ‍ॅथलेटिक्समधील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे मते असे की, ही आकडेवारी विद्यापीठ स्तरावर, वयासंबंधी आणि शासकीय स्तरावरील स्पर्धेत डोपिंग झाल्यामुळे वाढली. ही आकडेवारी नाडाच्या रेकॉर्डनुसार पुढे आली, हे विशेष.