शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

क्षेपणास्त्रांच्या निर्यातीस भारत सज्ज

By admin | Updated: June 23, 2014 05:06 IST

भारत चीनपेक्षा कमी किमतीत लढाऊ विमान आणि क्षेपणास्त्रांची विक्री करू शकतो, असे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारत चीनपेक्षा कमी किमतीत लढाऊ विमान आणि क्षेपणास्त्रांची विक्री करू शकतो, असे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे एका वक्तव्यात शस्त्र निर्यात वाढवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला होता. त्या पार्श्वभूमीवर डीआरडीओने भारत लढाऊ विमान आणि क्षेपणास्त्रांची विक्री करू शकतो आणि त्यांचे उत्पादन शुल्क चीनसारखे देश विक्री करीत असलेल्या शस्त्रांपेक्षा कमी असणार आहे, असे म्हटले आहे. शस्त्रप्रणालीच्या निर्यातीसाठी देशाला एका ‘धोरणात्मक व्यवस्थे’ची आवश्यकता आहे. डीआरडीओने मित्र देशांना निर्धारित वेळेत शस्त्रांच्या विक्रीसाठी ‘एक खिडकी मान्यता’ची सूचना केली आहे, असे संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे प्रमुख अविनाश चंदर म्हणाले. निर्यात केली जाऊ शकेल अशा उपकरणांची आमच्याकडे यादी आहे. यामध्ये हलके युद्धविमान ‘तेजस’, ‘आकाश’ हवाई संरक्षण प्रणाली, ‘प्रहार’ क्षेपणास्त्र आणि ‘ब्रह्मोस’ क्रूझ मिसाईलसह अनेक प्रणालींची निर्यात केली जाऊ शकते, असेही चंदर म्हणाले. आम्ही शस्त्रप्रणालींच्या निर्यातीची शक्यता आणि एक धोरणात्मक व्यवस्था विकसित करण्याच्या प्रक्रियेवर चर्चा करीत आहोत, असेही ते म्हणाले. भारताला आपल्यासाठी शस्त्रास्त्र निर्मिती करायला हवी आणि इतर देशांनादेखील त्याचा पुरवठा करायला हवा, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलीकडे केले होते. त्यासंदर्भात डीआरडीओच्या अध्यक्षांना प्रश्न विचारण्यात आला होता. (वृत्तसंस्था)