शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात प्रिंट मीडियाची घोडदौड सुरूच!

By admin | Updated: May 9, 2017 13:33 IST

जगभरात प्रिंट मीडिया किंवा मुद्रित माध्यमांचा संकोच होत असताना भारतात मात्र मुद्रित माध्यमांची गेल्या 10 वर्षांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - जगभरात प्रिंट मीडिया किंवा मुद्रित माध्यमांचा संकोच होत असताना भारतात मात्र मुद्रित माध्यमांची गेल्या 10 वर्षांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन म्हणजचे एबीसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार  2006 ते 2016 या दशकभरात मुद्रित झालेल्या वृत्तपत्रांचे सरासरी दैनिक आकडेवारी 3.91 कोटी प्रतिंवरून 2.37 कोटी प्रती इतकी वाढली आणि ती 6.28 कोटी प्रती इतकी झाली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये ही वाढ वार्षिक 4.87 टक्के असून या वर्षी ही वाढ 8 टक्क्यांची असेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
देशभरात वाढलेली साक्षरता, अर्थव्यवस्थेनं घेतलेली उभारी आणि कमी किमतीत असलेली सहजसुलभ उपलब्धता ही वृत्तपत्रांच्या वाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे एबीसीने नमूद केले आहे. त्याशिवाय आकर्षक सहदैनिके, पुरवण्या आणि बदलती लेखनशैलीही वाढसाठी पूरक ठरत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 
एबीसीने सोमवारी पत्रकार परीषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. एबीसीचे अध्यक्ष व्यंकट यानी भारतातील एकूण माध्यमांमध्ये मुद्रित माध्यमांचा वाटा सर्वाधिक म्हणजे जवळपा 90 टक्के इतका असल्याचे सांगितले. गेल्या 10 वर्षांमध्ये प्रकाशनांची संख्याही चांगलीच वाढल्याचे ते म्हणाले. तसेच पुढील 10 वर्षांमध्येही हे क्षेत्र दुपटीने वाढेल असे व्यंकट म्हणाले. 
आंतरराष्ट्रीय पातळीवर मुद्रित माध्यमांची वाढ खुंटलेली असताना भारतात मात्र या क्षेत्राची वाढ होत असल्याचे चित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाचकांनी मुद्रित माध्यमांनी केलेले बदल स्वीकारल्याचे यातून अधोरेखीत होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मुद्रित माध्यमांमध्ये गेल्या १५ वर्षांमध्ये ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, जवळपास तेवढीच गुंतवणूक येत्या दशकात केली जाईल असा अंदाजही ‘एबीसी’चे गिरीश अगरवाल यांनी व्यक्त केला आहे.
काही ठळक बाबी - 
- २०१६ अखेर देशातील दैनिके व वृत्तपत्रांची संख्या ९१०
- 2016 अखेरीस देशातील नियतकालिके, वार्षिकांची संख्या ५७
- एबीसीचे १,००० हून अधिक सदस्य आहेत.
- हिंदी वृत्तपत्रांचं वितरण सर्वाधिक असून त्यांची दैनिक सरासरी 2.2 कोटी प्रति इतकी आहे.
- त्याखालोखाल इंग्रजी वृत्तपत्रांचा 85.50 लाख प्रतिंसह दुसरा क्रमांक आहे.
- तिसऱ्या स्थानावर 45.50 लाख प्रतिंसह मल्याळी वृत्तपत्रे आहेत.
- तर त्याखालोखाल 43.30 लाख दैनंदिन खपासह मराठी वृत्तपत्रे आहेत.
भारतातल्या मुद्रित माध्यमांसाठी ही वाढ समाधानाची असून येत्या दशकातही ही वाढ अशीच राहील अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.