शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी कानपूरमध्ये

By admin | Updated: June 29, 2016 05:45 IST

न्यूझीलंडचा संघ आगामी सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे.

नवी दिल्ली : न्यूझीलंडचा संघ आगामी सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळले जातील. पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर २२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत खेळला जाईल.या दौऱ्याची घोषणा बीसीसीआयने आगळ्यावेगळ्या प्रकारे केली. कर्णधार विराट कोहली याने स्वत:च्या टिष्ट्वटर हँडलवर दौऱ्याची माहिती दिली. यानंतर अजिंक्य रहाणे याने दुसरी कसोटी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर ३० सप्टेंबर ते ४ आॅक्टोबरदरम्यान खेळली जाईल, असा खुलासा केला. मोहंमद शमीने यानंतर टिष्ट्वट करताना सांगितले, की दौऱ्यातील तिसरा आणि अखेरचा सामना ८ ते १२ आॅक्टोबर या कालावधीत ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.महान क्रिकेटपटू सय्यद मुश्ताक अली यांचे जन्मस्थान असलेल्या इंदूरमध्ये पहिल्यांदा कसोटी सामना होणार आहे. टीम इंडिया स्थानिक सत्राची सुरुवात कानपूरमधून करणार आहे. या शिवाय पाच वन-डे सामन्यांची मालिकादेखील होईल. पहिला सामना धर्मशाला येथे १६ आॅक्टोबरला, दुसरा सामना १९ आॅक्टोबरला दिल्लीत, तिसरा सामना २३ आॅक्टोबरला मोहालीत, चौथा सामना रांची येथे २६ आॅक्टोबरला आणि पाचवा सामना विशाखापट्टणम् येथे २९ आॅक्टोबरला खेळला जाईल. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ नव्या सत्राची सुरुवात करणार असल्याने ही मालिका महत्त्वपूर्ण असेल.’’ खेळाडूंकडून दौऱ्याची घोषणा करण्याची परंपरा खेळाडू आणि प्रेक्षक यांना आणखी जवळ आणेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.(वृत्तसंस्था)>न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रकपहिली कसोटी २२ ते २६ सप्टेंबर, कानपूरदुसरी कसोटी ३० सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर, इंदूरतिसरी कसोटी ८ ते १२ आॅक्टोबर, कोलकातापहिला वन डे १६ आॅक्टोबर, धर्मशालादुसरा वन डे १९ आॅक्टोबर, नवी दिल्लीतिसरा वन डे २३ आॅक्टोबर, मोहालीचौथा वन डे २६ आॅक्टोबर, रांचीपाचवा वन डे २९ आॅक्टोबर, विशाखापट्टणम्.