शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

काळ्या पैशाच्या मुद्यावर भारताला हवे स्वित्झर्लंडकडून आणखी सहकार्य

By admin | Updated: October 7, 2016 02:19 IST

काळ्या पैशाच्या मुद्यावर भारताला स्वित्झर्लंडकडून आणखी सहकार्याची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केले

नवी दिल्ली : काळ्या पैशाच्या मुद्यावर भारताला स्वित्झर्लंडकडून आणखी सहकार्याची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वीस कॉन्फेडरेशनच्या न्याय आणि आणि पोलीस विभागाच्या मंत्री सिमोनेता सोमारुगा यांच्याकडे ही अपेक्षा व्यक्त केली.सिमोनेता सोमारुगा या भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यानिमित्त दोन्ही देशांनी काही करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्याचे निमित्त साधून राजनाथ सिंग यांनी भारताच्या भावना त्यांच्याकडे बोलून दाखविल्या. अधिकृत निवेदनाद्वारे नंतर ही माहिती माध्यमांना देण्यात आली. निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंग यांनी सोमारुगा यांना सांगितले की, काळा पैसा हा भ्रष्टाचाराचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे त्यासंबंधीच्या माहितीचे आदान-प्रदान दोन्ही देशांत वाढायला हवे. स्वित्झर्लंडकडून भारताला अधिक सहकार्याची अपेक्षा आहे. याप्रसंगी दोन्ही नेत्यांनी काही करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात राजनैतिक पासपोर्ट धारकांना व्हिसा सूट, बेकायदेशील आगमनाची ओळख पटविणे व त्यांना मायदेशी पाठविणे यासाठीचा तांत्रिक करार आणि राजनैतिक निर्वासिंतांच्या संबंधित व्यवस्थेबाबतचा एक करार यांचा समावेश आहे. गृहमंत्र्यांनी सांगितले की, शांती आणि प्रगती भविष्यासाठी समायिक विचाराच्या आधारावर भारत आणि स्वित्झरलँडने शांती आणि संपन्नतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

बहुप्रवेश व्हिसाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा-

राजनाथ सिंग यांनी भारतीय व्यापाऱ्यांसाठी स्वित्झर्लंडकडे अधिक व्हिसा प्रणालीची मागणी केली. भारत स्वित्झर्लंडच्या व्यावसायासाठी अनेक वर्षांपासून बहुप्रवेश व्हिसा देण्याचा प्रस्ताव देत आला आहे. तथापि, त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, असा आग्रह राजनाथ सिंग यांनी सोमारुगा यांच्याकडे धरला.