शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

क्षेपणास्त्र प्रसारबंदी गटात भारत

By admin | Updated: June 28, 2016 06:02 IST

‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम’ (एमटीसीआर) या आंतरराष्ट्रीय गटात भारताला सोमवारी पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश मिळाला. या गटाचा भारत ३५ वा सदस्य आहे.

नवी दिल्ली : व्यापक संहाराची अस्त्रे, क्षेपणास्त्रे व हवेतून जमिनीवर मारा करू शकणारी मानवरहित विमाने यांचा प्रसार रोखण्यासाठीच्या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम’ (एमटीसीआर) या आंतरराष्ट्रीय गटात भारताला सोमवारी पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश मिळाला. या गटाचा भारत ३५ वा सदस्य आहे.संहारक शस्त्रास्त्रे व त्यांचे तंत्रज्ञान यांच्या प्रसारबंदीसाठी स्थापन झालेल्या कोणत्याही बहुराष्ट्रीय संघटनेत भारत सहभागी होण्याची ही पहिली वेळ आहे. अण्वस्त्र प्रसारबंदी रोखण्यासाठी अणुतंत्रज्ञान व त्यासाठीची साधनसामुग्री यांच्या हस्तांतरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन झालेल्या ‘न्यूक्लियर स्लापयर्स ग्रुप’ (एनएसजी) या ४७ देशांच्या संघटनेचे सदस्यत्व, चीनने खोडा घातल्याने भारताला मिळू शकलेले नाही. भारताला आता मिळालेले ‘एमटीसीआर’चे सभासदत्व हे तूर्तास दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखे मानायला हवे.अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केलेली नसल्याने भारताला ‘एनएसजी’चे सदस्यत्व देण्यास चीनने जोरदार विरोध केला व निकष शिथिल करून भारताला प्रवेश द्यायचा असेल, तर पाकिस्तानलाही तोच न्याय लावावा लागेल, असा आग्रह धरला. चीन ‘एमटीसीआर’चा सदस्य नाही. दोन नौदल सैनिकांना अटक झाल्यानंतर पूर्वी इटलीने भारताच्या या गटातील प्रवेशास विरोध केला होता, परंतु ते दोन्ही नाविक स्वदेशी परतल्याने इटलीचा विरोध मावळला. या संघटनेचा सदस्य झाल्याने भारतास इतर देशांकडून प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळू शकेल व त्यासाठी रशियाशी औपचारिक सहकार्य करता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)भारताचा हा प्रवेश आंतरराष्ट्रीय प्रसारबंदीचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास परस्पर फायदेशीर ठरेल. भारत आपल्या सदस्यत्वाला पाठिंबा देणाऱ्या एमटीसीआरच्या अन्य ३४ सदस्य देशांचा आभारी आहे. - प्रवक्ता, परराष्ट्र मंत्रालय