वॉशिंग्टन : भारतात धार्मिक अल्पसंख्य समाज आणि दलितांना भेदभावाची वागणूक मिळते, त्यांचा छळ होतो आणि २०१४ पासून धार्मिक द्वेषातून होणारे गुन्हे, सामाजिक बहिष्कार आणि सक्तीचे धर्मांतर लक्षणीयरित्या वाढले आहे, असा दावा युएस कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजस फ्रीडमने (युएससीआयआरएफ). केला आहे. ही बिगरसरकारी अमेरिकन संस्था आहे. अमेरिकेने मानवी हक्कांना भारताशी व्यापार आणि राजनैतिक संबंधांत महत्त्व द्यावे, असेही या संस्थेने म्हटले आहे.अहवालात म्हटले की, काँग्रेस पक्ष आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारांमध्ये धार्मिक अल्पसंख्य आणि दलितांना भेदभावाला आणि छळाला तोंड द्यावे याचे कारण म्हणजे चुकीचे किंवा फाजील व्यापक कायदे, अकार्यक्षम न्याय व्यवस्था आणि न्यायतत्वातील सातत्याचा अभाव. २०१४ पासून धार्मिक द्वेष, सामाजिक बहिष्कार, हल्ले करण्याचे आणि सक्तीचे धर्मांतर अशा गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे.भारताच्या काही भागांत गेल्या काही वर्षांत धार्मिक सहिष्णुतेची परिस्थिती खालावली असून धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन वाढले आहे. या उलट्या परिस्थितीला पुन्हा सरळ करण्यासाठी भारत आणि राज्य सरकारांनी आपापले कायदे देशाच्या राज्यघटनेतील बांधिलकी आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचा दर्जा यांच्याशी मिळतेजुळते करून घेतले पाहिजेत, असेही या २२ पानांच्या अहवालात म्हटले आहे.
भारतात अल्पसंख्य, दलितांचा छळ, भेदभावाची वागणूक
By admin | Updated: February 10, 2017 01:04 IST