शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या वेळी अंतराळातून असा दिसतो भारत !

By admin | Updated: April 13, 2017 19:43 IST

अमेरिकेची अवकाश संशोधन एजन्सी नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन(नासा)ने अलिकडेच भारताचे नयनरम्य असे छायाचित्र प्रसिद्ध केले

नवी दिल्ली, दि. 13 - अमेरिकेची अवकाश संशोधन एजन्सी नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन(नासा)ने अलिकडेच पृथ्वीची काही नयनरम्य छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. या पृथ्वीच्या रात्रीच्या दरम्यान घेतलेल्या छायाचित्रात भारत अगदी उठून दिसतो आहे. 2012या वर्षीही नासानं पहिल्यांदा अंतराळातून पृथ्वीच्या घेतलेल्या छायाचित्राला नाइट लाइट्स म्हणून संबोधण्यात आलं होतं. तसेच गेल्या 25 वर्षांत प्रत्येक दशकात नासा छायाचित्र जारी करत असतेच. नासाचे संशोधकही नाइट लाइट्सचे अप्रतिम छायाचित्र रोजच्या रोज अपडेट करण्यासाठी प्रयत्नशील असतात, जेणेकरून प्रत्येक ऋतूची भविष्यवाणी समजून त्याप्रमाणे नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखण्यात मदत मिळेल. अंतराळातून पृथ्वीच्या रात्रीच्या घेतलेल्या छायाचित्रात पहिल्यांदा 2012 या वर्षात भारताचं छायाचित्र प्रसिद्धीस देण्यात आलं होतं. त्यानंतर 2016मध्ये भारताचं दुसरं छायाचित्र प्रसिद्धीस दिलं होतं. 2012 ते 2016 या चार वर्षांत भारताची लोकसंख्या झपाट्यानं वाढल्याचं 2016ला अंतराळातून काढलेल्या छायाचित्रातून दिसतं आहे. नासाचे गोड्डार्ड स्पेस प्लाइट सेंटरचे पृथ्वी संशोधक मिगुएल रोमन या रिसर्च टीमचं नेतृत्व करत आहेत. ते अंतराळातील सर्वाधिक लांबची छायाचित्र काढण्यासाठी एक सॉफ्टवेअरही विकसित करत आहेत. 2016 या वर्षीच्या अंतराळातील भारताच्या छायाचित्रामधून चंद्राचा प्रकाश हटवण्यात आला आहे. सेटलाइटवरील व्हिजिबल इन्फ्रारेड इमेजिंग रेडिओमीटर सुयट (VIIRS)च्या मिळालेल्या डेटाचा हा परिणाम आहे. नासाच्या मते, व्हीआयआयआरएस असं पहिलं सेटलाइट उपकरण आहे की, जे प्रकाशाचे उत्सर्जन तसेच सावलीचं योग्य आकलन करू शकतं. त्यामुळे संशोधकांना रात्रीच्या वेळेस दिसणा-या प्रकाशाच्या स्त्रोतांची माहिती मिळते.

(अंतराळातील 2012 या वर्षीचं भारताचं छायाचित्र)

(अवकाशातील 2016 या वर्षीचं भारताचं छायाचित्र)