शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लष्करावर खर्च करणाऱ्या टॉप-५ देशांमध्ये भारत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:59 IST

लष्करावर सर्वाधिक खर्च करणाºया टॉप-५ देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.

नवी दिल्ली : लष्करावर सर्वाधिक खर्च करणाºया टॉप-५ देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. भारत आता अमेरिका आणि चीन यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. मात्र संरक्षण खात्याचा बहुतांशी खर्च वेतन व निवृत्ती वेतनावरच होतो.स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिप्री) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, २0१७ मध्ये भारताचा लष्करावरील खर्च ५.५ टक्क्यांनी वाढून ६३.९ अब्ज डॉलरवर गेला. भारताचा लष्करी खर्च आता फ्रान्सपेक्षा अधिक झाला आहे.अहवालात म्हटले आहे की, जगाचा लष्करावरील खर्च अल्प प्रमाणात वाढून १.७३ लाख कोटींवर गेला आहे. हा खर्च जागतिक सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.२ टक्के आहे. लष्करावर सर्वाधिक खर्च करणाºया देशांत अमेरिका आणि चीनचा दबदबा कायम आहे. अमेरिकेचा लष्करावरील खर्च ६१0 अब्ज डॉलर तर चीनचा २२८ अब्ज डॉलर आहे.सिप्रीने म्हटले की, चीन, भारत आणि सौदी अरेबिया यांचा लष्करावरील खर्च वाढल्यामुळे लष्करी समतोल आता आशिया, ओशिनिया आणि पश्चिम आशिया यांच्या बाजूने झुकला आहे. आशियात चीनचा लष्करी खर्च सर्वाधिक आहे.चीनचा लष्करी खर्च २0१७ मध्ये जागतिक लष्करी खर्चाच्या तुलनेत वाढून १३ टक्के झाला. तो २00८ मध्ये ५.८ टक्के होता. लष्करी खर्च वाढल्यामुळे चीनचा वृद्धीदर कमी झाला आहे.‘इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडी’चे संशोधक लक्ष्मण कुमार यांनी सांगितले की, भारताचा लष्करी खर्च वाढला असला, तरी वाढीव तरतुदीतील बहुतांश निधी वेतन आणि निवृत्ती वेतनावरच खर्च होत आहे. भारतीय लष्कराच्या प्रत्यक्ष सेवेत १0 लाख ४0 हजार जवान असून, २0 लाख निवृत्ती वेतनधारक आहेत.