शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१ आॅक्टोबरपासून भारत ठप्प

By admin | Updated: September 8, 2015 02:45 IST

देशातील टोल वसूल करण्याच्या पद्धतीत अनेक त्रुटी असून, त्याऐवजी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करीत देशातील मालवाहतूकदारांनी १ आॅक्टोबरपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे.

मुंबई : देशातील टोल वसूल करण्याच्या पद्धतीत अनेक त्रुटी असून, त्याऐवजी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करीत देशातील मालवाहतूकदारांनी १ आॅक्टोबरपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. मालवाहतूकदारांची शिखर संघटना असलेल्या आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने तसे निवेदन पंतप्रधान कार्यालयाला दिले आहे.यासंदर्भात वारंवार केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर कोणताही तोडगा निघत नसल्याने संपाचा पवित्रा घ्यावा लागल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष अमृतलाल मदान यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मदान म्हणाले, की सरकारचा कोणत्याही प्रकारचा महसूल बुडवण्याचा संघटनेचा उद्देश नाही. त्यामुळेच सरकारला टोलच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलाहून १० टक्के जास्त रक्कम देण्याची तयारी वाहतूकदारांनी दर्शवली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारला वर्षाच्या शेवटी मिळणारा महसूल संघटना वर्षाआधीच देण्यास तयार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशातून टोलच्या माध्यमातून वर्षाला १४ हजार कोटी रुपये वसूल केले जातात, असा मदान यांचा दावा आहे. मात्र टोलनाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे खर्च होणाऱ्या वेळ आणि इंधनामुळे देशाचे ८८ हजार कोटींचे नुकसान होते, असेही सरकारी आकडेवारी सांगते. परिणामी सरकारने दिलेल्या माहितीवरून देशाच्या विकासात टोलनाके मोठा अडसर ठरत असल्याचा आरोप मदान यांनी केला.अवजड वाहनांसह हलक्या चारचाकी वाहनांच्या टोलमधून मिळणारी एकहाती रक्कम वाहतूकदार संघटना भरण्यास तयार आहे. त्यामुळे सर्वच वाहनांची टोलधाडीतून मुक्तता होणार आहे. त्यामुळे सरकारने या पर्यायावर थोडासा विचार केल्यास सर्वच वाहनमालकांचा पैसा व वेळ वाचणार आहे.पैसा वसूल करण्याचा सोपा मार्गकेंद्रीय पातळीवर वाहतूक करणारे वाहतूकदार दरवर्षी केंद्रीय परवाना काढतात. त्यासाठी सरासरी १५ हजार रुपये खर्च होतो. त्यात ५० हजार रुपयांची वाढ करून टोल कर वसूल केल्यास १६ हजार कोटींचा महसूल शासनदरबारी जमा होईल. याशिवाय होणारे नुकसान डिझेलच्या भावात २ रुपये वाढ केल्यावर भरून निघेल, असाही पर्याय संघटनेने सुचवलेला आहे.टोलची पद्धत बदलाएका टोलसाठी गुंतवणूक केलेले ४०० कोटी रुपये दोन ते चार वर्षांत वसूल होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. मात्र २० ते २५ वर्षे टोलमध्ये वाढ करूनही कंत्राटदार टोल वसूल करीत असतात. शिवाय कित्येकवेळा टोलमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलेला आहे. त्यामुळे टोल वसूल करण्याची पद्धत बदलण्याची संघटनेची मागणी आहे...तर कोट्यवधींचे नुकसानवाहतूकदारांच्या संपात लॉरी, ट्रक, टेम्पो, टँकर आणि सर्वच वाहतूक क्षेत्रातील ७५ लाख वाहने सामील होणार आहेत. त्यामुळे दुधापासून एलपीजी गॅसपर्यंतची सर्वच अत्यावश्यक सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. परिणामी देशाचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.