शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भारतात 'या' राज्यात होतात सर्वाधिक आंतरजातीय विवाह..

By admin | Updated: May 14, 2016 10:59 IST

भारतात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण अवघे ५ टक्क आहे मात्र त्यापैकी ५५ टक्के आंतरजातीय लग्न ही मिझोरममध्ये होतात.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १४ - नुकताच प्रदर्शित झालेला 'सैराट' हा चित्रपट सध्या बराच गाजत असून त्यामध्ये मांडण्यात आलेल्या आंतरजातीय विवाहाच्या मुद्यावरूनही बरीच चर्चा सुरू झाली आहे. आपल्या देशभरात आंतरजातीय विवाह करणा-यांना पटकन स्वीकारलं जात नाही. जातीच्या अभिमानापायी कित्येक पालकांनी आपल्या पोटच्या गोळ्याचीच हत्या केल्याच्या 'ऑनर किलींग'च्या घटनाही ऐकल्या आहेत. देशात आंतरजातीय विवाह स्वीकारले जात नसले तरी आपल्याच देशात असं एक राज्य आहे जिथे सर्वात जास्त म्हणजे ५५ टक्के आंतराजातीय विवाह होतात. आणि ते राज्य आहे मिझोरम...

'इंडियन ह्यूमन डेव्हलपमेंट'ने केलेल्या या सर्व्हेमध्ये भारतातील 33 राज्यांसह तसंच केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४१ हजार ५५४ कुटुंबाचा समावेश करण्यात आला होता.नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) सर्वेक्षणानुसार भारत फक्त ५ टक्के आंतरजातीय विवाह होतात, मात्र त्यापैकी सर्वात जास्त आंतरजातीय विवाह मोझारममध्ये होतात. भारतासारख्या बहुधर्मीय देशात ९५ टक्के लग्न ही स्वजातीतच केली जातात, आंतरजातीय लग्नांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. पण मिझोरम हे राज्य त्याला अपवाद आहे. मिझोरममील बहुसंख्य नागरिक हे ख्रिश्चनधर्मीय असून तिथे तब्बल ५५ टक्के लग्न ही आंतरजातीय लग्न होतात. तर या क्रमवारीत दुस-या क्रमांकावर आहे मेघालय हे राज्य, जेथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण आहे ४६ टक्के आणि  ३८ टक्क्यांसह सिक्कीम तिसऱ्या स्थानावर आहे. ३५ टक्के आंतरजातीय विवाहांसह मुस्लिमबहुल जम्मू-काश्मीर हे चौथ्या तर गुजरात पाचव्या स्थआनावर आहे, आंतरजातीय लग्नाचे प्रमाण १३ टक्के आहे.

मध्य प्रदेशात होतात सर्वाधिक स्वजातीय विवाह

दरम्यान भारतात स्वजातीय विवाह होण्याचे सर्वाधिक प्रमाण मध्य प्रदेशमध्ये होत असल्याची माहिती या सर्व्हेतून समोर आली आहे. तेथे ९९ टक्के नागरिक त्यांच्याच जातीतील व्यक्तीशी विवाह करतात. तर हिमाचल प्रदेश, छत्तीसगड व गोव्यातील 98 टक्के विवाहही स्वतजातीतच केले जातात. तर पंजाबमध्ये ९७ टक्के विवाह स्वजातीत होतात.