शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशात ५९ वाघ रेडिओ कॉलरधारी!

By admin | Updated: April 27, 2016 02:29 IST

देशातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये ५९ वाघांना रेडिओ कॉलर बसविण्यात आले आहे

नवी दिल्ली : देशातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये ५९ वाघांना रेडिओ कॉलर बसविण्यात आले आहे आणि कॉलर लावल्यामुळे मिळणारी माहिती त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले.पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ३५ वाघांना रेडिओ कॉलर बसविण्यात आले आहे तर राजस्थानच्या दोन अभयारण्यात १४ वाघांना हे उपकरण लावण्यात आले आहे. या रेडिओ कॉलरची किंमत ते कुठल्या कामासाठी वापरले जात आहे त्यावर अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तीन ते चार वर्ष चालणाऱ्या बॅटरीवर आधारित व्हीएचएफ रेडिओ कॉलरची किंमत २५ ते ३० हजार रुपयांपर्यत असते. हा कॉलर ठराविक क्षेत्रात वन्यजीवांवर नजर ठेवण्याच्या कामात येतो. जीपीएस, अ‍ॅक्टिव्हिटी सेन्सर, मोर्टेलिटी सेन्सर, व्हीएचएफ, यूएचएफ, आॅटोमॅटिक ड्रॉप आॅफसारख्या आधुनिक रेडिओ कॉलरची किंमत तीन ते साडेचार लाख एवढी असते. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणने (एनटीसीए) रेडिओ कॉलरमुळे वाघांना असलेल्या संभाव्य धोक्याचे कुठलेही मूल्यांकन केले नसल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.पेंचमध्ये एका वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला असल्याची माहिती देताना ते म्हणाले की, पन्ना आणि सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील सर्व वाघांना कॉलर लावण्यात आले असून ते मजेत आहेत. रेडिओ कॉलरच्या माध्यमाने वाघांबद्दल गोळा केलेली माहिती त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रदीर्घ काळ महत्त्वाची असते.