शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

लडाखमध्ये पकडण्यात आलेल्या चिनी सैनिकाची घरवापसी; भारतीय लष्कराकडून सुखरुप पाठवणी

By कुणाल गवाणकर | Updated: October 21, 2020 09:15 IST

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या आवाहनाला भारताकडून सकारात्मक प्रतिसाद

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमधला तणाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वी चिनी लष्कराच्या एका सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतलं होतं. या सैनिकाची भारतीय सैन्याकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. काल रात्री भारतीय लष्करानं या सैनिकाला चिनी लष्कराच्या ताब्यात दिलं. भारतीय सैन्यानं चिनी सैनिकाची सुटका करावी, असं आवाहन चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून करण्यात आलं होतं. या आवाहनाला भारताकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.काही गुराख्यांना रस्ता दाखवताना एका सैनिकानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आणि तो चुकून भारतीय हद्दीत गेला, असं चिनी लष्करानं म्हटलं होतं. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका सैनिकाला पूर्व लडाखमधील डेमचोक सेक्टरमध्ये पकडण्यात आल्याची माहिती भारतीय लष्करानं सोमवारी दिली. हा सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भटकताना आढळून आला. बुधवारी भारतीय लष्करानं या सैनिकाला चीनच्या ताब्यात दिलं.भारतीय लष्करानं चिनी सैनिकाची सुखरुप पाठवणी केल्यानंतर चिनी सैन्यानं भारतीय जवानांचे आभार मानले. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमधील तणाव वाढला आहे. गलवान खोऱ्यातल्या हिंसक झटापटीनंतर या तणावात आणखी भर पडली. या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचंही मोठं नुकसान झालं. यानंतर चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी तो उधळून लावला. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत-चीनच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये आठपेक्षा जास्त वेळा बैठका झाल्या आहेत.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख