शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाईचे भारत-सायप्रसचे आवाहन

By admin | Updated: April 29, 2017 00:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस अ‍ॅनास्टासियाडेस यांनी शुक्रवारी द्विपक्षीय, तसेच प्रादेशिक मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस अ‍ॅनास्टासियाडेस यांनी शुक्रवारी द्विपक्षीय, तसेच प्रादेशिक मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. हिंसाचाराच्या कारखान्यांना अभय देणाऱ्या देशांविरुद्ध सर्व देशांनी निर्णायक कृती करण्याच्या आवश्यकतेबाबत उभय नेते सहमत झाले. मोदी-निकोस बैठकीनंतर उभय देशांनी हवाई सेवा आणि व्यापारी जहाज वाहतुकीसह चार करारांवर स्वाक्षरी केली. सायप्रस अध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, महत्त्वाच्या मुद्यांवर भारत नेहमीच सायप्रसच्या बाजूने उभा राहील. सायप्रसचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि प्रादेशिक अखंडत्वाला भारताचा कायम पाठिंबा आहे. आम्ही परस्पर हिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक तद्वतच आंतरराष्ट्रीय मुद्यावर सविस्तर चर्चा केली, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आमच्या भागात हिंसाचाराचे कारखाने सुरू करणाऱ्यांविरुद्ध सर्व देशांनी मिळून निर्णायक कारवाई करण्याची गरज असल्याबाबत आमचे एकमत झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत लवकर सुधारणा घडवून आणण्याबाबतही उभय देशांचे एकमत झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचा कायम सदस्य म्हणून समावेश करण्यास पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी सायप्रसचे कौतुक केले. तत्पूर्वी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी सायप्रसच्या अध्यक्षांची भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्याच्या क्षेत्रांविषयी त्यांच्याशी चर्चा केली होती.