बीजिंग : भारत आणि चीनने ऐतिहासिक पंचशील तत्त्वांचे पालन करून आपसातील मतभेद कमी करणो आवश्यक आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये मतभेदांपेक्षा परस्परहिताला अधिक महत्त्व आहे, असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले. पंचशील कराराला 6क् वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे आयोजित एका विशेष समारंभाला शनिवारी ते संबोधित करत होते. यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष थेन सेन यांची उपस्थिती होती.
पाच दिवसांच्या चीन दौ:यावर आलेले उपराष्ट्रपती अन्सारी पुढे म्हणाले, भारत, चीन आणि म्यानमार यांच्यातील संबंध हे दीर्घकालीन आणि भौगोलिक आहेत. विकासाच्या निरनिराळ्या टप्प्यावर आपण असलो तरी आपणाला एकमेकांच्या राष्ट्रीय अनुभवापासून खूप काही शिकावे लागेल. यासाठी पंचशील हा एक उत्तम मार्ग आहे.
‘जागतिक कृतीसाठी आम्हाला एका नव्या मॉडेलची गरज आहे. आपले नशीब हे एकमेकांत गुंतलेले आहे. उभय देशांतील समाजाच्या सहअस्तित्वासाठी आव्हाने व संधी यांचा एक आराखडा तयार करावा लागणार आहे. यासाठी पंचशील एका मध्यस्थाप्रमाणो भूमिका बजावेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले. (वृत्तसंस्था)
परस्पर सहकार्य, समन्वयित कृती, विकासविषयक अनुभवाची देवाण-घेवाण आणि उभय देशांतील आव्हानांचा निपटारा करण्यासाठी पंचशील तत्त्वांची मोठी मदत होईल,’ असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. अन्सारी यांनी यावेळी प्राचीन नागरीकरण आणि शेजारी यापासून ते भारत आणि चीन हे एकमेकांचे धोरणात्मक भागीदार झाल्याच्या वास्तवाकडे लक्ष वेधले.
राष्ट्रप्रमुखांनी दिल्या शुभेच्छा
पंचशील कराराला 6क् वर्षे पुर्ण झाल्यानिमित्ताने भारत, चीन आणि म्यानमारच्या राष्ट्राप्रमुखांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या. पंचशील करार आपसातील संबंध दृढ करण्यासाठीच मोलाचा नसून अन्य देशांसोबतच्या व्यवहारासाठीही दिशादर्शक असेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. 2क्14 हे ‘भारत-चीन मैत्री आणि देवाण-घेवाण वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. (वृत्तसंस्था)
4एकमेकांची भौगोलिक अखंडता व सार्वभौमत्व यांचा आदर करणो
4भूप्रदेशात घुसखोरी न करणो
4अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप न करणो
4समानता आणि परस्परांचे हित
4शांततापूर्ण सहअस्तित्व.
भारत, चीन व म्यानमार यांच्यात 1954 मध्ये करार झाला होता. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व त्यांचे चिनी समपदस्थ चाऊ एन लाय यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली.
हा करार म्यानमारनेही स्वीकारला.