शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत, चीनने जबाबदार बनावे’

By admin | Updated: May 7, 2014 23:10 IST

भारत आणि चीनसारख्या मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करणार्‍या देशांनी हवामान बदलाचा जागतिक प्रश्न सोडविण्याच्या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी जबाबदार बनले पाहिजे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

वॉशिंग्टन : भारत आणि चीनसारख्या मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करणार्‍या देशांनी हवामान बदलाचा जागतिक प्रश्न सोडविण्याच्या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी जबाबदार बनले पाहिजे, असे अमेरिकेने म्हटले आहे. भारत आणि चीनबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जे कार्नी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, अधिक कार्बन उत्सर्जन करणार्‍या देशांनी या समस्येला सामोरे जाण्यासाठी जबाबदार बनणे हे निश्चितपणे खूप गरजेचे आहे. अमेरिकेचा राष्ट्रीय हवामान अहवाल आल्यानंतर अमेरिकेने ही प्रतिक्रिया दिली. या अहवालात वाढते तापमान, आणि अनियमित हवामानाच्या परिणामांपासून बचावासाठी अमेरिकेला तयार करण्याच्या दृष्टीने तात्काळ पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था) कार्नी म्हणाले, ऊर्जा आयात बंद करणे, ऊर्जास्रोतांमध्ये विविधता आणणे हे निश्चितपणे अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताचे आहे. त्यामुळेच या समस्येचा समग्र मुकाबला हवामान बदलाच्या परिणामांपासून बचावासाठी आमची तयारी आणि क्षमता चांगली करण्यासाठी गरजेचा आहे. हवामान बदलाचे वातावरणावर होणारे परिणाम गंभीर आहेत आणि त्याचा आमचा देश, आमची जनता व अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. अनेक दिवस राहणारे अधिक तापमान आणि गंभीर दुष्काळी परिस्थिती तुम्ही पाहतच आहात. मोठ्यात मोठी वादळे येत आहेत. ज्यात आम्ही सँडी वादळ पाहिले. वैज्ञानिक अनुमानानुसार ही वादळे आणखी तीव्र बनणार आहेत. (वृत्तसंस्था)