शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...म्हणून 100% मेड इन इंडिया मोबाईल सध्या अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:10 IST

भारतीय भागीदारीला दूर करून चिनी कंपन्यांचा बाजारावर कब्जा

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतात चिनी उत्पादनांना विरोध वाढला आहे. सोशल मीडियातून स्वदेशीचा स्वीकार करण्यावर भर दिला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे.मेक इन इंडियाने फायदाहा बदल सरकारच्या कर धोरणामुळे झाला. चीनमधून तयार फोनची आयात केल्यावर १२.५ टक्के आयात शुल्क लावले जायचे. सुटे भाग आयात करून एसईजेमध्ये फोन तयार केल्यावर फक्त एक टक्का कर द्यावा लागायचा. याच कारणामुळे शाओमी, विवो आणि ओप्पोसारखे दिग्गज चिनी ब्रँडस्देखील आपले फोन मेक इन इंडियांतर्गत भारतात तयार करीत आहेत. प्रोसेसर, डिस्प्ले, रॅम आणि मदरबोर्ड व दुसरे सुटे भाग चीनकडूनच आयात केले जात आहेत.गेल्या काही वर्षांत स्थितीत सुधारणा झाली आहे. परंतु पूर्णपणे स्वदेशी स्मार्टफोन आणि टीव्हीसारखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने अजून फार दूर आहेत. अमेरिकन आयफोन असो की कोरियन सॅमसंग किंवा भारतीय ब्रँडचा मायक्रोमॅक्स आणि लावा भारतात बाजारात विकला जाणारा कोणताही फोन पूर्णपणे मेड इन इंडिया असल्याचा दावा करू शकत नाही. वस्तुस्थिती अशी की, मेक इन इंडियाच्या ब्रँडिंगसोबत बाजारात असलेल्या बड्या ब्रँडचे फोन चीनमधून आयात केलेल्या सुट्या भागांतूनच बनविले जात आहेत. आज शाओमी, ओप्पो, रियलमी, वनप्लस, विवो, हवाई, लेनेवो, मोटोरोला, टेक्नो आणि इन्फिनिक्ससारख्या चिनी ब्रँडस्ने आज भारतीय बाजारातील 72% व्यवसाय बळकावला आहे.चिनी कंपन्यांची घुसखोरी2013 नंतर अनेक चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारात असलेल्या मायक्रोमॅक्स, लावा, इंटेक्ससारख्या भारतीय ब्रँडमधील हिस्सेदारीवर कब्जा केला आहे. त्या आधीपर्यंत त्या चीनहून सुटे भाग मागवून भारतात फोन तयार करायच्या किंवा चीनमधून तयार फोन आयात करून आपल्या ब्रँडसोबत देशी बाजारात विकत होत्या. परंतु २०१३ नंतर भारतीय ब्रँडसाठी फोन बनविणे बंद करून चिनी कंपन्या भारतात दाखल झाल्या. याचे सगळ्यात मोठे उदाहरणमायक्रोमॅक्स आहे.2014 मध्ये हा भारतीय ब्रँड देशी बाजारातील १८ टक्के मागणी चीनची उपकरणे विकून पूर्ण करीत होता. परंतु आज त्याची हिस्सेदारी एक टक्का आहे. त्याच्यासाठी उपकरणे बनविणाºया टॉपवाईजने तिच्याशी संबंध तोडून कोमियो नावाने भारतात आपला ब्रँड सादर केला.2014 मध्ये भारतात फक्त १९ हजार कोटी रुपयांचे फोन तयार केले जात होते. परंतु मेक इन इंडियांतर्गत येत्या दोन वर्षांत ही उलाढाल ९० हजार कोटी रुपयांपर्यंत गेली होती.

रोजगाराची मोठी संधीभारतात फोनची जुळणी करण्यातून मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होतात. चिनी ब्रँडस् रियलमीने नुकताच दावा केला की, आम्ही दहा हजार लोकांना रोजगार देऊ आणि 50 टक्के सुट्या भागांचे उत्पादनही भारतात करू. शाओमीनेदेखील तिच्या असेम्ब्ली प्लँटमध्ये ९० टक्के महिलांना रोजगार देऊ असे म्हटले. शाओमी आणि अ‍ॅप्पलसाठी फोन बनविणाऱ्या फॉक्सकॉनच्या असेम्ब्ली प्लँटमध्ये हजारोंच्या संख्येने लोकांना रोजगार मिळाला आहे. सॅमसंगनेदेखील नोएडात आपला सगळ्यात मोठा मोबाईल कारखाना सुरू करून हजारो लोकांना रोजगार दिला आहे.

टॅग्स :chinaचीनMobileमोबाइल