शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या प्रत्युत्तरात पाकमध्ये ८ जणांचा मृत्यू

By admin | Updated: August 26, 2014 10:29 IST

शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय सैन्याच्या छावण्या आणि सीमा रेषेवरील गावांवर हल्ला गोळीबार करणे पाकिस्तानलाच महागात पडले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ - शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय सैन्याच्या छावण्या आणि सीमा रेषेवरील गावांवर हल्ला व गोळीबार करणे पाकिस्तानलाच महागात पडले आहे. पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात गेल्या दहा दिवसांत पाकिस्तान सैन्यातील जवानांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १२ जण जखमी झाले आहेत. 
जम्मू काश्मीरमधील भारत - पाक सीमा रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) आहे. पाकिस्तानी रेंजर्सच्या तुलनेत बीएसएफचे जवान अधिक सक्षम असून बीएसएफच्या जवानांकडील शस्त्रही पाकच्या तुलनेने चांगली आहेत. त्यामुळे बीएसएफने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचेच जास्त नुकसान होते अशी माहिती बीएसएफच्या एका अधिका-याने दिली आहे. गेल्यावर्षी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे १३ जवान शहीद झाले होते. यावर्षी आत्तापर्यंत भारताचा एक जवान शहीद झाला आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर यंदा भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानमधील तीन जवान, तीन नागरिक आणि दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि बीएसएफचे महासंचालक डी..के. पाठक यांची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत गृहमंत्र्यांनी बीएसएफला पाठिंबा देत पाकला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे करताना सीमा रेषेवरील गावांमध्ये राहणा-या नागरिकांची काळजी घ्यावी अशी सूचनाही देण्यात आली आहे. 'पाक सैन्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देत असलो तरी त्यांच्या गावांमधील नागरिकांना आम्ही लक्ष करत नाही' असेही अधिका-याने सांगितले. तर भारतीय हद्दीतील गावांमधील रहिवाशांना दररोज रात्री पाकच्या हल्ल्याचा फटका बसणार नाही अशा सरकारी इमारती आणि शाळांमध्ये पाठवले जाते व सकाळी त्यांना पुन्हा गावात आणले जाते.