शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बालगुन्हेगारांची संख्या वाढतेय

By admin | Updated: May 7, 2016 01:34 IST

विविध सामाजिक कारणांमुळे कायदे मोडणाऱ्या मुलांची संख्या वाढत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच बाल सुधार गृहांमध्ये दरवर्षी अशा मुलांची गर्दी वाढत आहे.

नवी दिल्ली : विविध सामाजिक कारणांमुळे कायदे मोडणाऱ्या मुलांची संख्या वाढत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच बाल सुधार गृहांमध्ये दरवर्षी अशा मुलांची गर्दी वाढत आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकार प्रयत्नशील असून बाल न्याय कायदा २०१५ लागू करण्यात आला आहे.महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी शुक्रवारी राज्यसभेत ही माहिती दिली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या. त्या म्हणाल्या, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार २०१२ साली गंभीर गुन्ह्यांसह विविध गुन्ह्यांत अटक झालेल्या मुलांची संख्या ३९८२२ एवढी होती. २०१३ मध्ये ती ४३,५०६ झाली. तर २०१४ साली हा आकडा ४८२३० वर पोहोचला.२०१२ मध्ये ९६७७, २०१३ ला ९५४९ व २०१४ ला ८७०० मुलांना निगराणी गृह व विशेष गृहांमध्ये पाठविण्यात आले. १५ जानेवारी २०१६ पासून बाल न्याय (बालकांची देखरेख आणि संरक्षण) कायदा २०१५ लागू करण्यात आला आहे. परंतु अद्याप राज्यांनी त्याची अंमलबजावणी करायची आहे. नव्या कायद्याच्या कलम ४१ अंतर्गत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मुलांसाठी असलेली गृहे व संस्थांना याचे पालन न केल्यास दंड ठोठावला जाईल. तसेच कलम ५३ नुसार या संस्थांमध्ये शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, मानसिक आरोग्याची काळजी आदी माध्यमाने मुलांच्या पुनर्वसनाची तरतूद करण्यात आली असल्याचेही गांधी यांनी सांगितले.त्यांनी सांगितले की, केंद्राद्वारे प्रायोजित सर्वंकष बाल संरक्षण योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१४ पासून वित्तीय मापदंडांमध्ये सुधारणा करण्यात आली. सुधारगृहांमधील मुलांच्या उदरनिर्वाह भत्त्यात मुलाप्रती दर महिन्याला ७५० रुपयांवरुन रु. २००० एवढी वाढ करण्यात आली.सुधारगृहांची पाहणीखा.दर्डा यांनी विचारलेल्या अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात मेनका गांधी यांनी सांगितले की, इ.स. २०१४-१५ मध्ये ओडिशातील ६, राजस्थान १४,पश्चिम बंगाल १३ आणि मध्य प्रदेशातील ८ बालगृह व संस्थांची पाहणी करण्यात आली. यादरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्या. बऱ्याच सुधारगृहांमध्ये सहज पोहोचणे शक्य होत नाही. तेथे मुलांची नियमित आरोग्य तपासणी होत नसून व्यावसायिक प्रशिक्षण, मनोरंजन सुविधा अत्यंत निम्न दर्जाच्या आहेत.