शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील वाढते अत्याचार थांबविणार

By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST

महिलांवरील वाढते अत्याचार थांबविणार

महिलांवरील वाढते अत्याचार थांबविणार
शासनाचा उपक्रम : पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा सभा
नागपूर : महिलांवर होणारे रस्त्यावरील अत्याचार थांबविण्यासाठी व त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मूलभूत उपाययोजना आखणीबाबत राज्य शासनाने एका परिपत्रकान्वये उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार महिला सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या अध्यक्षतेत आढावा सभा पार पडली.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित बैठकीला महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता भादीकर, कळमेश्वर व कन्हान-पिपरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व्ही. के. अंधारे, रामटेक पालिकेच्या मुख्याधिकारी गीता वंजारी, मोहपा येथील मुख्याधिकारी शिला बोरकर, सावनेरचे मिलिंद साठवणे तसेच इतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महिलांच्या सुरक्षिततेबाबत सार्वजनिक स्थळांच्या सुरक्षेचा महिला सुरक्षा समितीच्या अध्यक्ष पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी माहिती जाणून घेतली. शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना डॉ. सिंह यांनी दिली. बैठकीत निर्जनस्थळांची यादी बनविण्यात यावी, तसेच याबाबत व्यापक सुरक्षा व्यवस्था कशी करावी, यावर सखोल चर्चा करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजनांच्या माहितीबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले. महिलांवरील अत्याचाराविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे निर्भय पुरस्कार दिला जाईल. याबाबतची माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहोचवून पुरस्काराबाबत अधिकाधिक माहिती होईल, या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे मार्गदर्शन त्यांनी बैठकीत केले. (प्रतिनिधी)