शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून वाढीव भत्ते

By admin | Updated: June 29, 2017 01:59 IST

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्यासह इतर अनेक भत्ते वाढीव दराने देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी काही सुधारणांसह मंजुरी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्यासह इतर अनेक भत्ते वाढीव दराने देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी काही सुधारणांसह मंजुरी दिली. याचा लाभ केंद्र सरकारच्या देशभरातील नोकरीतील ३४ लाख मुलकी कर्मचारी व सैन्य दलांमधील १४ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.गेल्या वर्षी जूनमध्ये सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढविला होता. सुधारित भत्ते १ जुलैपासून लागू होतील. म्हणजेच कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्यांपोटी थकबाकी मिळणार नाही. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी वेतन आयोगाच्या भत्त्यांविषयीच्या शिफारशींना काही सुधारणांसह मंजुरी दिल्याची त्रोटक घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. घरभाडे भत्त्यात भरघोस वाढ-घरभाडे भत्त्यात वाढ मंजूर झाली. त्याचा लाभ ७.५ लाख कर्मचाऱ्यांना मिळेल. ‘एक्स’, ‘वाय’ आणि ‘झेड’ वर्गातील शहरांसाठी घरभाडे भत्ता मूळ पगाराच्या अमुक्रमे २४%, १६% व ८% एवढा मिळेल. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा घरभाडे भत्ता दरमहा अनुक्रमे ५,४०० रु., ३,६०० रु. व १,८०० रुपयांपेक्षा कमी असणार नाही. ही किमान रक्कम १८ हजार रुपये किमान मासिक पगाराच्या अनुक्रमे ३०%, २०% व १०% असेल. महागाई भत्ता ५० टक्के व १०० टक्के होईल तेव्हा घरभाडे भत्ताही त्यानुसार वाढविण्याची शिफारस आयोगाने केली होती. त्याऐवजी महागाई भत्त्यात २५% व ५०% वाढ झाल्यावर त्यानुसार घरभाडे वाढविले जाईल.बहाद्दर सैनिकांची कदर-सियाचीनसारख्या ठिकाणी अत्यंत खडतर परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या लष्करी जवान व अधिकाऱ्याच्या विशेष भत्त्यातही दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. तेथील सैनिकांना दरमहा १४ हजारांऐवजी ३० हजार रुपये व अधिकाऱ्यांना २१ हजारांऐवजी दरमहा ४२,५०० रुपये विशेष भत्ता मिळेल.आजारी पेन्शनरना दिलासा-पेन्शनरांना‘फिक्स्ड मेडिकल अलाउन्स’ दुप्पट म्हणजे दरमहा ५०० ऐवजी एक हजार रुपये मिळेल. पूर्णपणे असहाय अवस्थेत असलेल्या पेन्शनरना कायम मदतनीस ठेवण्यासाठी दिला जाणारा भत्ताही ४,५०० रुपयांवरून वाढून ६,७५० रुपये.

वर्षाला ३०,७४८.२३ कोटी रुपयांचा बोजा-सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या तपशिलानुसार, आयोगाच्या शिफारशींनुसार भत्ते दिले असते तर सरकारवर दरवर्षी २९,३०० रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला असता. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या सुधारणांमुळे हा बोजा आणखी १,४४८.२३ कोटींनी वाढून आता वर्षाला ३०,७४८.२३ कोटी रुपयांचा होईल. गेल्या वर्षी वेतन आयोगानुसार मूळ पगार वाढविल्याने सरकारचा खर्च सुमारे ७८ हजार कोटी रुपयांनी वाढला होता.वेतन आयोगाने १९३ भत्त्यांचा अभ्यास करून ५३ भत्ते रद्द करण्याची व ३७ भत्ते इतर भत्त्यांमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली. भत्त्यांचे सुधारित दर महागाई भत्त्याशी निगडित असावेत, असेही सुचविले. सरकारने आयोग लागू करताना भत्त्यांच्या विचारासाठी वित्त सचिव अशोक लवासा यांची समिती नेमली होती. समितीच्या शिफारशींच्या आधारे बुधवारी निर्णय झाला.नर्सिंग अलाउन्स दरमहा ४,८०० वरून वाढून ७,२०० रुपये.आॅपरेशन थिएटर अलाउन्स दरमहा ३६० ते ५४० रुपये अशी वाढ.