शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासदारनिधी २५ कोटी रुपयांपर्यत वाढवा लोकसभेत एकमुखी मागणी : सरकारकडून आश्वासन नाही

By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST

नवी दिल्ली : खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी(एमपीएलएडी) वार्षिक पाच कोटींवरून २५ कोटी रुपये करण्याची मागणी अनेक खासदारांनी शुक्रवारी लोकसभेत केली मात्र सरकारने कोणतीही

नवी दिल्ली : खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी(एमपीएलएडी) वार्षिक पाच कोटींवरून २५ कोटी रुपये करण्याची मागणी अनेक खासदारांनी शुक्रवारी लोकसभेत केली मात्र सरकारने कोणतीही
घोषणा करण्याचे टाळले.
संपूर्ण मतदारसंघाच्या विकासात्मक मागण्या पाहता पाच कोटींचा निधी पूर्णपणे अपुरा ठरतो, असे
भाजपचे उदयप्रताप सिंग यांनी शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना म्हटले. त्यांनी ही रक्कम १५ कोटी रुपये करण्याची मागणी केली असता अन्य सदस्यांनी २५ कोटींचा घोषा लावत जोरदार समर्थन दिले. त्यावर सभागृहाची तशी इच्छा असेल तर माझे समर्थनच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. पीठासीन अध्यक्ष एम. थम्बीदुराई यांनी ही मागणी फेटाळली. खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आधीच ही मागणी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्याकडे केली आहे, असे सांगतानाच त्यांनी संसदीय कार्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांना सभागृहाची एकमुखी मागणी सरकारला कळवावी, असे सुचविले. (वृत्तसंस्था)
----------------------------
रेल्वेमंत्र्यांकडून समर्थन
रुडी यांच्यासह रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदारांच्या निधीत वाढ करण्याला अनुकूलता दर्शविली असून तसे पत्र समितीकडे पाठविले होते, याचे स्मरण थम्बीदुराई यांनी करवून दिले. सरकारने याआधीच सभागृहाच्या भावनेची दखल घेतली असून पुन्हा सरकारला भावना कळविली जाईल, असे रुडी यांनी स्पष्ट केले.