शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार

By admin | Updated: June 17, 2017 23:14 IST

रेंद्र मोदी सरकारने येत्या पाच वर्षांत सात कलमी कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे लक्ष्य ठरवले आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास

वडोदरा : नरेंद्र मोदी सरकारने येत्या पाच वर्षांत सात कलमी कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे लक्ष्य ठरवले आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे दिली. देशाच्या वेगवेगळ््या राज्यांत शेतकऱ्यांत निर्माण झालेल्या अस्वस्थेच्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी मोदी यांनी या सात कलमी धोरणाला जाहीर केले होते. त्यात शेतकऱ्यांनापिकांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, उत्तम दर्जाची बियाणे आणि पीक काढल्यानंतर होणारे नुकसान टाळणे आदीचा समावेश होता. येथून ४० किलोमीटरवरील आणंद येथे शुक्रवारी जावडेकर यांच्या हस्ते मेकिंग आॅफ डेव्हलपड् इंडिया मेलाचे (मोदी फेस्ट) उद््घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. सात कलमांचा तपशील सांगताना जावडेकर म्हणाले की,‘‘पर ड्रॉप, मोअर क्रॉपद्वारे सिंचनावर मोठा भर असून त्यासाठी आर्थिक तरतूदही मोठी आहे. उत्तम दर्जाची बियाणे आणि प्रत्येक शेतजमिनीचा कस वाढवण्यासाठी पोषकघटक उपलब्ध करून देणे, गोदामांसाठी मोठी गुंतवणूक आणि कापणीनंतर पिकांची होणारी हानी टाळण्यासाठी शीतगृहांची साखळी निर्माण करणे तसेच अन्न प्रक्रियेद्वारे उत्पादनाची मूल्यवृद्धी करणे, राष्ट्रीय पातळीवर शेती बाजारपेठ तयार करणे, ५८५ स्टेशन्सवर ई प्लॅटफॉर्म तयार करणे, कुक्कुटपालन, मधमाशा पालन, मासेमारी आदी जोडव्यवसायाला प्रोत्साहन आणि परवडणाऱ्या किमतीत जोखीम कमी करणारी नवी विमा योजना सुरू करणे हे देखील या योजनेचे भाग आहेत.’’ निमकोटेड युरिया खताच्या छोट्या पिशव्या उपलब्ध झाल्यामुळे युरिया खताचा वापर कमी झाला असून त्यावरील वार्षिक अनुदानापोटीचे सात हजार कोटी वाचले आहेत, असेही जावडेकर म्हणाले.पूर्वी शेतीतील उत्पादन वाढवण्याची पद्धत टाळून त्याऐवजी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर आमचा भर आहे, असे जावडेकर म्हणाले. 2022 पर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे ठरवले आहे.