नवी दिल्ली: प्रतिकूल परिस्थिती आणि ठरावीक पगारात कुटुंबाचा गाडा हाकणा:या नोकरदार व मध्यमवर्गावर कराचा आणखी बोजा टाकण्याची आपली मनापासून इच्छा नाही व वित्तीय गणित सांभाळत शक्य झाले तर प्राप्तिकरासाठीची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणखी वाढवली जाऊ शकेल, असे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींनी शनिवारी दिले.
‘पीटीआय’च्या येथील मुख्यालयात या वृत्तसंस्थेच्या पत्रकार कर्मचा:यांशी वार्तालाप करताना जेटली म्हणाले, की पगारदार अन् मध्यवर्गावर आणखी बोजा टाकण्याऐवजी करसंकलनाचे जाळे अधिक विस्तृत करून कर चुकविणा:यांच्या मागे लागणो वित्तमंत्री म्हणून मी पसंत करेन.
वित्तमंत्री म्हणाले की, करआकारणीचे जाळे विस्तारणो म्हणजे तरी नेमके काय? माझा मदतनीस व माङया राहणीमानात फरक असला तरी तोही माङयाएवढेच अप्रत्यक्ष कर भरतो. वास्तवात आज आपण भरीत असलेल्या एकूण करांपैकी निम्मे अप्रत्यक्ष कर आहेत. वस्तू आणि सेवांचा उपभोग घेणारा प्रत्येक जण उत्पादन शुल्क, सीमाशुल्क व सेवाकर भरीतच असतो. पण प्राप्तिकरासारख्या प्रत्यक्ष कराच्या बाबतीत तसे नाही. त्यामुळे करपात्र उत्पन्न असूनही कर चुकविणा:यांना करसंकलानाच्या जाळ्य़ात आणणो हे ख:या अर्थाने जाळे विस्तारणो आहे व व्यक्तिश: मी त्यास पूर्णपणो अनुकूल आहे.
अधिक खर्च अधिक कर
गेल्या वेळी मी प्राप्तिकराची करमुक्त मर्यादा दोन लाखांवरून वाढवून अडीच लाख रुपये केली आणि (अन्य मार्गाने) जास्त पैसा उभा करणो शक्य झाले, तर ही मर्यादा मी आणखीही वाढवीन. खरेतर करदात्याच्या खिशातून जास्त पैसा काढून घेण्याऐवजी त्याच्या हाती जास्त पैसा राहावा, जेणोकरून तो अधिक खर्च करेल व त्यातून अप्रत्यक्ष कर अधिक गोळा होतील, यास प्रोत्साहन देणो आपल्याला आवडेल. - अरुण जेटली
वित्तमंत्री म्हणाले..
करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख रुपये असे म्हटले, तरी इतर वजावटी विचारात घेता प्रत्यक्षात साडेतीन ते चार लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला सध्या प्राप्तिकर भरावा लागत नाही. एवढेच नव्हे, तर दरमहा 35 ते 4क् हजार रुपये कमावणा:यानेही चार पैसे बचतीसाठी बाजूला ठेवले तर त्यालाही कर भरावा लागणार नाही. पण सध्याचा राहणीमान खर्च, प्रवास खर्च, मुलांच्या फी वगैरे पाहता बचत करणो शक्य
होत नाही, असे या उत्पन्नवर्गातील लोक म्हणतात.
करआकारणीचे जाळे विस्तृत करण्यासाठी वजावटीच्या बाबी कमी करण्यास माझा विरोध आहे. माझा तसा दृष्टिकोनही नाही. माङया मनासारखे मला करता आले व हाती अधिक निधी असेल तर कर आकारणी अधिक विस्तृत करण्याची माझी इच्छा आहे. पण सध्याची महसुलाची स्थिती आव्हानात्मक आहे. खरेतर गेल्यावेळीच मी क्षमतेहून जास्त सवलती दिल्या होत्या.
गेल्या मे महिन्यात ‘रालोआ’ सरकार सत्तेवर आल्यानंतर अंतरिम अर्थसंकल्प मांडणारे जेटली येत्या फेब्रुवारीत पूर्णाशी अंदाजपत्रक मांडणार आहेत.