शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा उत्पन्न मिळवण्यासाठीच्या खर्चात वाढ

By admin | Updated: April 17, 2017 01:44 IST

रेल्वेचा परिचालन खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला असल्याचे बुधवारी लोकसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आले

नवी दिल्ली : रेल्वेचा परिचालन खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला असल्याचे बुधवारी लोकसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आले. याचाच अर्थ रेल्वेकडे सार्वजनिक प्रवासी सेवा देण्यासाठी उपलब्ध असणारा पैसा कमी झाला आहे. सभागृहात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, रेल्वेचे २0१४-१५ या वर्षातील परिचालन गुणोत्तर ९१.३ टक्के होते. २0१५-१६ मध्ये ते सुधारून ९0.५ टक्के झाले. मात्र २0१६-१७ मध्ये मात्र ते पुन्हा वाढून ९४.९ टक्के झाले. २0१६-१७ मधील हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वांत वाईट समजले जात आहे. रेल्वेसाठी परिचालन गुणोत्तर ८0 टक्के असणे सर्वोत्तम समजले जाते. परिचालन गुणोत्तर हे प्रत्येक रुपया कमावण्यासाठी रेल्वेला येणारा खर्च दर्शविते. २0१६-१७ मधील ९४.९ टक्के परिचालन गुणोत्तराचा अर्थ असा होतो की, रेल्वेला १00 पैसे (१ रुपया) कमावण्यासाठी ९४.९ पैसे खर्च आला. परिचालन गुणोत्तराचा आकडा जेवढा कमी असेल, तेवढा चांगला समजला जातो. परिचालन गुणोत्तराचा छोटा आकडा संबंधित संस्थेच्या उत्त्तम वित्तीय प्रकृती आणि व्यवस्थेचा निदर्शक असतो. रेल्वेचा आस्थापनावरील खर्च वाढल्यामुळे परिचालन गुणोत्तर प्रमाण वाईट स्थितीत गेले असल्याचे रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी सभागृहाला सांगितले. गोहेन म्हणाले की, २0१६-१७ मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन यावरील रेल्वेचा खर्च वाढला. वाढीव खर्चाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेला सुधारित परिचालन गुणोत्तर काढावे लागले. ते ९४.९ टक्के इतके आले. सातव्या वेतन आयोगामुळे रेल्वेच्या खर्चावर मोठा बोजा पडला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) सातव्या वेतन आयोगाचा वाढीव खर्च भागविण्यासाठी रेल्वेने वित्त मंत्रालयाकडून अर्थसाह्य मागितले आहे. तथापि, वित्त मंत्रालयाने अर्थसाह्यास नकार दिला आहे. खर्च भागविण्यासाठी स्वत:चे स्रोत तयार करण्याची सूचना वित्त मंत्रालयाने रेल्वेला केली आहे.