शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपींचा परवाना होणार रद्द कारवाईत वाढ : ठोस कारवाईसाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न

By admin | Updated: August 7, 2015 21:35 IST

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. सहा महिन्यांत ७२१ मद्यपींवर कारवाई झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांवर ठोस कारवाईच्या उद्देशाने त्यांचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. सहा महिन्यांत ७२१ मद्यपींवर कारवाई झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांवर ठोस कारवाईच्या उद्देशाने त्यांचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांवर कारवाई करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी तीव्र केली आहे. शहरात रस्त्यांवर, चौकात नाकाबंदी करून या कारवाया होत आहेत. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी गतवर्षी एकूण ११०४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली होती. त्यांच्याकडून दंड स्वरूपात १० लाख २१ हजार रुपये जमा झालेले होते. तर २०१५ या चालू वर्षात जून अखेरपर्यंत ७२१ जणांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८ लाख ६८ हजार रुपयांची दंडाची रक्कम जमा झालेली आहे. ही संख्या गतवर्षीच्या जून अखेरपर्यंतच्या कारवाईच्या दुप्पट आहे. परंतु कारवाया करूनही अशा प्रकारांना आळा बसलेला नाही. वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या ठिकाणांत पामबीच मार्गाचाही समावेश आहे. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे पामबीच मार्ग जीवघेणा ठरत आहे. मद्यपान करून वाहने चालवली जात असल्याने अपघातांचे प्रमाण मोठे आहे. अशा अपघातामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांवर वाहतूक पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. परंतु अनेकांवर एकापेक्षा जास्त वेळा कारवाया होवूनही त्यांच्यावर वचक बसलेला नाही. वाहतूक पोलीस चलन फाडताच न्यायालयात एक हजार रुपये दंड भरल्यानंतर पुन्हा मोकळे, असा मद्यपी वाहन चालकांचा समज झाला आहे. त्यामुळे एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई झाल्यानंतरही पुढच्या कारवाईला ते तयार असतात. याचा मनस्ताप वाहतूक पोलिसांना होत आहे. कायद्याची भीती निर्माण व्हावी यासाठी मद्यपी वाहन चालकांवर कडक कारवाईची गरज असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
अनेक शहरांमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईत संबंधित चालकाच्या परवान्यावर रिमार्क दिला जातो. पुन्हा तीच व्यक्ती कारवाईत आढळल्यास त्याला कठोर कारवाईला सामोरे जावे लागते. अशीच कारवाई नवी मुंबईत करण्यसाठी वाहतूक पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यावर लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
..........
वाहतूक पोलिसांकडून सातत्याने ड्रंक अँड ड्राईव्हवर कारवाया केल्या जात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने कारवाया केल्या आहेत. अनेक जणांवर वारंवार एकच कारवाई करावी लागत आहे. त्याकरिता पहिल्याच कारवाईत त्यांचा परवाना रद्द करावा असा निर्णय घेण्याची मागणी न्यायालय व आयुक्तांकडे केली जाणार आहे.
- अरविंद साळवे, वाहतूक पोलीस उपआयुक्त