शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाख करदात्यांना प्राप्तिकराच्या नोटिसा

By admin | Updated: February 1, 2017 01:21 IST

नोटाबंदीच्या काळात म्हणजे ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या काळात बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमांचा भरणा करणाऱ्यांपैकी ज्यांचे व्यवहार त्यांच्या ताज्या प्राप्तिकर

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात म्हणजे ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या काळात बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमांचा भरणा करणाऱ्यांपैकी ज्यांचे व्यवहार त्यांच्या ताज्या प्राप्तिकर रिटनर्शी मेळ खात नाहीत असे १८ लाख करदाते प्राप्तिकर विभागाने हुडकून काढले असून त्यांना नोटिसा पाठविण्यात येत आहेत.वित्त मंत्रालयातील महसूल विभागाचे सचिव हसमुख अढिया यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, नोटाबंदीच्या काळात बँक खात्यांमध्ये केल्या गेलेल्या मोठ्या व्यवहारांची सर्व माहिती देण्यास बँकांना सांगण्यात आले होते. ‘डेटा अ‍ॅनेलेटिक्स’ तंत्राचा वापर करून आता या माहितीचे विश्लेषण करण्याची ‘आॅपरेशन क्लीन मनी’ नावाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एका निवेदनात सांगितले की, प्राप्तिकर विभागाकडे प्राप्तिकर रिटर्न भरलेल्या सर्व करदात्यांचा डेटाबेस उपलब्ध आहे. नोटाबंदीच्या काळात बँकांमध्ये केले गेलेले मोठ्या रकमांचे व्यवहार ‘डेटा अ‍ॅनेलेटिक्स’ तंत्र वापरून या टेडाबेसशी ताडून पाहिले जात आहेत. ज्यांचे व्यवहार त्यांच्या ताज्या प्राप्तिकर रिटर्नशी विसंगत असल्याचे सकृद्दर्श नी दिसते त्यांचे वर्गीकरण केले जात आहे. या निवेदनानुसार ‘आॅपरेशन क्लीन मनी’च्या पहिल्या टप्प्यात असे सुमारे १८ लाख करदाते आढळून आले आहेत. त्यांना नोटिसा पाठवून १० दिवसांत खुलासा करण्यास सांगण्यात येत आहे. करदात्यांकडून होणारा खुलासा समाधानकारक वाटला नाही तर त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)पोर्टलवर खुलासा कराज्यांना या नोटिसा पाठविल्या जातील त्यांना आपला खुलासा प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलरवरही करता येईल. यासाठी पोर्टलवर मार्गदर्शन उपलब्ध असेल.खातेदारांना त्यांच्या आक्षेप घेतलेल्या व्यवहारांचे ‘आॅनलाइन व्हेरिफिकेशन’ही करता येईल. याची सूचना संबंधित करदात्यांना ई-मेल व एसएमएसने दिली जाईल.