सात लॅन्ड डेव्हलपर्सवर आयकर विभागाची धाड
By admin | Updated: February 6, 2015 01:17 IST
नागपूर : नागपूर व वर्धा येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी वर्ध्यातील सात लॅन्ड डेव्हलपर्सची कार्यालये व घरे आणि हिंगणघाट येथील स्वाद चहा कंपनीच्या कारखान्यात धाड टाकली.
सात लॅन्ड डेव्हलपर्सवर आयकर विभागाची धाड
नागपूर : नागपूर व वर्धा येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी वर्ध्यातील सात लॅन्ड डेव्हलपर्सची कार्यालये व घरे आणि हिंगणघाट येथील स्वाद चहा कंपनीच्या कारखान्यात धाड टाकली. सूत्रांच्या माहितीनुसार, २० आयकर अधिकाऱ्यांच्या २ पथकांनी सकाळी ७ वाजता कारवाईला सुरुवात केली. कृष्णनगरी लॅन्ड डेव्हलपर्सचे मालक महेश गुल्हाने, भागीदार योगेश गावंडे, दीपक मांडवगडे व राहुल शर्मा, शिव गौरी लॅन्ड डेव्हलपर्सचे मालक राजू ढोबळे आणि भक्ती लॅन्ड डेव्हलपर्सचे संचालक राजू महाकाळकर यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे. याशिवाय मनोज वोरा यांच्या राधा मेडिकल्सवरही धाड टाकण्यात आली. नागपूर येथील महिला अधिकाऱ्यांनी स्वाद चहा कंपनीच्या आजंती शिवारातील (हिंगणघाट) कारखान्यावर धाड टाकली. जमीन खरेदी-विक्री करणारा दलाल बल्लू यांचे कार्यालय व घरात तपासणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.