शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूतील आरोग्यमंत्र्यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी

By admin | Updated: April 7, 2017 12:35 IST

तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजय भास्कर यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 7 - तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजय भास्कर यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. याव्यतिरिक्त दोन आमदार आणि काही औषध कंपन्यावर छापेमारी करत धडक कारवाई करण्यात आली आहे. अजूनही आयकर विभागाची छापेमारी मोहीम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी सकाळी तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजय भास्कर यांच्या चेन्नईतील घरावर आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी करत खळबळ उडवली. 
 
सीआरपीएफ जवानांच्या बंदोबस्तात आयकर विभागाचं पथक राज्याचे आरोग्य मंत्री, त्यांचे नातेवाईक आणि 10-12 औषध कंपन्यांवर छापेमारी करत आहेत. सोबत राज्यातील दोन आमदारांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. आयकर विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री आणि त्यांच्यासंबंधी काही जणांनी पोटनिवडणुकीदरम्यान काळ्या पैशांचा वापर केल्याची माहिती समोर आली. आतापर्यंत चेन्नईत जवळपास 32 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. शिवाय पथकाचा तपास अद्याप सुरू असल्याचीही माहिती आहे. 
 
छापेमारी करणा-या पथकातील एका अधिका-याने सांगितलं की, आर.के. नगर परिसरात विजय भास्कर यांनी मतदारांना पैसे वाटल्याची तक्रार चार जणांकडून करण्यात आली होती. यामुळे आरोग्यमंत्री आणि त्यांचे नातेवाईक आयकर विभागाच्या रडारवर आहेत. 
 
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान विजय भास्कर यांचं नाव चर्चेत होते. माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी मला बाजूला हटवण्यात विजय भास्कर यांचा हात असल्याचा आरोपही केला होता. शिवाय पार्टी सोडण्यासाठी दबाव टाकल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.  
 
तर दुसरीकडे, आता आयकर विभागानं भास्कर यांच्या घरावर मारलेल्या छापेमारी कारवाईमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते.